आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेल्हारा तालुक्यातील बहुतांश भागात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह धो धो पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
यावर्षी जून महिना उलटल्यानंतरही तेल्हारा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर वर्ग चिंतातूर झाले होते. काही बागायतदार शेतकऱ्यांनी पेरण्या वेळीच उरकल्या तर त्या पाठोपाठ कोरडवाहू शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली. आठ दिवसांपासून दररोज सकाळ-संध्याकाळ आकाशात पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत होता. दरम्यान यामध्ये तेल्हारा तालुक्यातील शेरी, माळेगाव, दानापूर या भागासह तेल्हारा शहरात सर्वात जास्त प्रमाणात पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यातील आडसुळ भागात तुरळक सरी बरसल्या. वादळी पावसाने सर्वांची दाणादाण उडविली. परिसरात हवेमुळे झाडांची पडझड सुध्दा झाली. तालुक्यातील गाडेगाव येथे एक लिंबाचे मोठे झाड हवेमुळे कोसळले.
सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. तालुक्यातील गाडेगाव येथील आस नदीला पूर आला. यावर्षीचा हा पहिलाच पूर आहे. नदीला पूर आल्याने लोकांनी नदी काठावर गर्दी केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.