आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पाऊस:शहरासह ग्रामीण भागात बरसला जोरदार पाऊस ; वाहतूक विस्कळीत, ठिकठिकाणी साचले पाणी

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बुधवारी १५ जूनला सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे विविध भागातील रस्त्यावर आणि मोकळ्या मैदानासह सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दरम्यान शहरालसह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. रात्री नऊ वाजतापर्यंतही विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. नऊ वाजताच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी झाला. जिल्ह्यातील मूर्तिजापूर, तेल्हारा, हविरखेड, दानापूर, बार्शीटाकळी, पातूर येथे जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागांत शेतातील पिकाच्या नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री आठ वाजता झालेल्या पावसानंतर रस्त्यावर पाणी साचले होते. दोन दविसांच्या उघडीपीनंतर आलेल्या पावसामुळे उकाड्यामुळे त्रासलेल्या अकोलेकरांना दिलासा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...