आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरडवाहू शेतकरी आनंदात:अकोला जिल्ह्यात आनंदघन बरसले; मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. अकोल्यामध्ये शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर सहावाजता जोरदार सरींसरसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

पावसाच्या धुवाधार सरिंमुळे अकोलेकरांची उन्हाच्या प्रकोपापासून सूटका झाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजतापासून आकाशामध्ये जोरदार विजेचा कडकडाट सुरू झाला. मात्र, बराच वेळ पाऊस आला नाही. त्यामुळे यावेळी पाऊस दांडी देतो का? अशी शक्यता वाटत होती. पण अर्धातासातच जोराच्या वाऱ्यासह शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली.

यापूर्वी मागील आठवड्यामध्ये पावसाच्या एन्ट्री झाली होती. यावेळी शहरातील अनेक भाग कोरडाच राहिला होता. आजचा पावसामुळे संपूर्ण शहर ओलेचिंब झाले आहे. संपूर्ण भागात मेघगर्जना, विजांचा लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह धुवाधार स्वरुपाच्या पाऊस एक ते सव्वा तास बरसला. अकोला तालुका व शहर परिसरात पावसाचा जोर दिसून येतो आहे. ठिकठिकाणी प्रचंड वेगात वादळी वारे पाहत आहेत.

कोरडवाहू शेतकरी आनंदात

वादळी पावसामुळे ग्रामीण भागात फळबागांच्या नुकसानिची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांच्या कामाला लागले आहेत. कापूस, सोयाबीन पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ग्रामीण भागामध्ये पाऊस

शनिवारी सायंकाळी मूर्तिजापूरमधील काही भागात जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय तेल्हारा, दानापूर, बोरगाव मंजू, कुरणखेड, हिवरखेड, बार्शीटाकळी येथे धुवाधार पावसाने एन्ट्री केली आहे.

बातम्या आणखी आहेत...