आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकिकडे धुळवडीत भररस्त्यावर मद्यपींकडून धिंगाणा घातला जात असतानाच दुसरीकडे मात्र पर्यावरण पूरक व व्यवसनमुक्तीचा निर्धार करीत तरूण गुरुदेव सेवकांनी मंगळवारी हाेळी महोत्सव साजरा केला.त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करीत राष्ट्रधर्माचा विचार अंगिकारला. राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समिती व राष्ट्रधर्म युवा मंचातर्फे पर्यावरण पूरक ,रंगमुक्त व व्यसनमुक्त होळी महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले.
महाेत्सवात या विषयांवर झाले मंथन
महाेत्सात वृक्ष लागवड करणें, वृक्ष संवर्धन करणे, पक्षांकरिता पाणी पिण्यासाठी झाडांवर जलपात्र बांधणे, रंगपंचमीला रासायनिक रंग न वापरता जनजागृती कार्यशाळा आयोजित करणे, व्यसनमुक्त समाज व्हावा, यासाठी भजनांचे संमेलन घेणे, व स्मशानभूमीत वृक्षारोपण करून विविध संतांचे पुतळे,फुलांची बाग सजवून सौंदर्यीकरण करणे, सुसंस्कार शिबिरांचे आयोजन करणे आदींवर चर्चा झाली. पातूर तालुक्यातील तांदळी बु. हे गाव आदर्श करण्यासाठी दत्तक घेण्यात आले.
भजनांच्या माध्यमातून मांडले िवचार
भजनांच्या माध्यमातून गुरुदेव सेवकांनी राष्ट्रसंतांचे विचार मांडले. यात रामराव पाटेखेडेकर, श्रीकांत पुंडकर, शुभम वरणकार, भीमराव गावंडे, प्रल्हाद निखाडे,रामकृष्ण गावंडे ,प्रसाद बरगट, सचिन महोकार आदींचा समावेश हाेता. सािहत्य संमेलनात रांगाेळी काढण्यासह अन्य सेवा करणाऱ्या सुरभी दोडके व वैष्णवी टिकार यांच्यासह युवा राष्ट्रमंचच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.