आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकीचे बनवले हेलिकॉप्टर:अकोल्यातील व्यावसायिकाची शक्कल, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनोखे अभिवादन

अकोला । करुणा भांडारकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अकोल्यातील एका व्यावसायिकाने अनोख्या पद्धतीने भारतभूमीला अभिवादन केले. ३० वर्षांपासून फेब्रिकेशन व्यवसायात असलेले मनोज खंडेलवाल यांनी चक्क चारचाकी गाडीला हेलिकॉप्टरचे रूप दिले आहे. ७५ वर्षांत आपल्या देशाने प्रत्येक क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. हाच अभिमान त्यांनी हेलिकॉप्टरच्या प्रतिकृतीतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य दिनी शहरातील विविध कार्यक्रमात ही हेलिकॉप्टर-गाडी आज प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

1 महिना काम
मनोज खंडेलवाल एमआयडीसी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जल्लोष आहे. यात आपलाही सहभाग असावा असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्याकडे २० वर्ष जुनी टाटा इंडिका गाडी होती. या गाडीसोबत त्यांचे खास नाते आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत गाडीची विक्री केली नाही. याच गाडीचे रूपांतरण त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये करून देशाला अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. एक महिन्यापासून ते स्वत: आणि 3 कारागिरांच्या परिश्रमातून गाडीला हेलिकॉप्टरचे रूप देण्यात आले.

पाहण्याची संधी

हे अनोखे हेलिकॉप्टर रविवारी सायंकाळी प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आळशी प्लॉट खंडेलवाल भवन येथे ठेवण्यात आले. यावेळी येथून जाणाऱ्या प्रत्येकांच्या नजरा या अनोख्या मॉडेलकडे वळल्या होत्या. येणारे-जाणारे थांबून फोटो, सेल्फी काढून घेत होते. १५ ऑगस्ट रोजी शहरातून ११ वाजता निघणाऱ्या १०० मिटर तिरंगा रॅलीमध्ये हेलिकॉप्टर सहभागी होणार आहे. त्यानंतर आज आणि उद्या शहरातील काही प्रमुख भागात फिरल्यानंतर दिवसभर खंडेलवाल भवन येथे लोकांना हे मॉडल बघता येणार आहे.

व्यवसायिक मनोज खंडेलवाल
व्यवसायिक मनोज खंडेलवाल
आज आणि उद्या हे हेलिकॉप्टर नागरिकांना पाहता येईल.
आज आणि उद्या हे हेलिकॉप्टर नागरिकांना पाहता येईल.
बातम्या आणखी आहेत...