आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानूतन वर्षाच्या प्रारंभीच रवविारी हेल्मेटसक्तीची अंमलबाजवणी करण्यात आली. परविहन विभागाने (आरटीओ) माेहीम राबवत वाहन चालवताना हेल्मेट न वापणाऱ्या ४२ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरटीआेकडून हेल्मेटसक्तीची माेहीम सुरू करण्यात आल्याने वाहन चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्यांनी कारवाईचा धसका घेतला आहे. महानगरातील अनेक मुख्य रस्ते िसमेंट काँक्रिटचे झाले आहेत.
िजल्ह्याला जाेडणारे रस्तेही गुळगळीत झाले आहेत. मात्र या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. बहुतांश अपघात वाहतूक िनयमांचे पालन न केल्याने हाेतात. २०२२ या वर्षात ११० अपघाताच्या घटना घडल्या हाेत्या. या दुर्घटनांमध्ये १२० जणांना आपला जीव गमवावा लागला. यापैकी अनेक दुचाकीधारकांनी हेल्मेट घातले नव्हते. वाहन चालवताना त्यांनी हेल्मेट वापरले असते त्यांचा जीव वाचला असता. जास्तीत-जास्त ते अपघातात जखमी झाले असते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा, असे आवाहन आरटीओ विभागातर्फे करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.