आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील अनेक शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. अकोल्यामध्येही काही वर्षांपूर्वी हेल्मेटसक्ती करण्यात आली. मात्र, मधल्या काळात कारवाईत शिथिलता देण्यात आली होती. मात्र, आता १ जानेवारीपासून पुन्हा दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती असणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात अकोलेकरांना हेल्मेट घालण्याच्या संकल्पापासून सुरुवात होणार आहे.
हेल्मेटबाबात नियम काय?
दुचाकीवर प्रवास करतांना मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२९ प्रमाणे दुचाकीधारकांनी योग्य मानकांचे हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ पासून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.
कारवाईशिवाय प्रतिसाद नाही
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला मार्फत वेळोवेळी जनजागृती व विशेष तपासणी मोहिम राबवून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मोहीम सुरू झाल्यानंतर दुचाकीधारकांकडून हेल्मेटसाठी प्रतिसाद मिळतो, परंतु त्यानंतर पुन्हा दुचाकीधारक विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करतात. अपघात झाल्यास डोक्याला दुखापत होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. त्यानुषंगाने जिल्ह्यात 1 जानेवारी २०२३ पासून पुन्हा ही मोहीम राबविण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
इलेक्ट्रानिक गाड्यांबाबत नियम काय?
सध्या शहरामध्ये इलेक्ट्रानिक्स वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. रस्त्यावर मोठ्या संख्येत इ-बाईक धावताना दिसतात. दिवसेंदिवस पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इ-बाईक खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, इलेक्ट्रानिक्स वाहनांना आरटीओचे नियम लागू होत नाहित. त्यामुळे ई-बाईक वाहकांना हेल्मेटसक्तीमध्ये मोडण्यात येईल का? याबाबत प्रशासनस्थरावर निश्चिती नाही. याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे इ-बाईकस्वारांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.