आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दवि्य मराठी विशेष:विधवा, महिलांसह दवि्यांगांना मदत; आमदार हरिश पिंपळे, तहसीलदार हामंद यांची उपस्थिती

बार्शीटाकळी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमध्ये अनेक कुटूंबांच्या घरची कर्ती मंडळी सोडून गेली. घरातील महिलांवर आर्थिक जबाबदारी आली. या महिलांसह कोरोना काळात पालक गमावलेले बालक, अपंग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून शुक्रवारी धनादेश व पविळं राशन कार्डचे वाटप करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनमित्त तहसील कार्यालय सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मूर्तजिापूरचे आमदार हरिष पिंपळे उपस्थित होते. या वेळी तहसीलदार गजानन हामंद, भाजपा ता. अध्यक्ष राजू काकड, नगर पंचायतचे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, महसूल विभागाचे नायब तहसीलदार मंचावर उपस्थित होते. प्रथम पुष्पहार देऊन मान्यवराचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधवा महिलांना २० हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच विधवा, निराधार, दवि्यांग व्यक्तींना पविळे राशन कार्ड वाटप करण्यात आले.

गरजूंना मदत म्हणून शासनाची ही योजना उपयुक्त आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार हरिष पिंपळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अभार प्रदर्शन तहसीलचे अव्वल कारकून कैलास ढोरे यांनी केले. कार्यक्रमात सहाय्यक म्हणून महसूल सहाय्यक संजीव देशमुख यांनी काम पाहिले. तहसील पुरवठा विभागाचे कार्ड वितरक राजू शिरसाट, रुग्णकल्याण समिती सदस्य मो. सादिक, सामाजिक कार्यकर्ते शिलवंत ढोले, जाधव, राजेश मोहड, लिपिक अनिल चाहकर, महिला व नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...