आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • High Court Notice To 3 Persons Including Municipal Commissioner Likely To Escalate Dispute Of Municipal Teacher Samriddhi Co operative Credit Institution

मनपा आयुक्तांसह 3 जणांना उच्च न्यायालयाची नोटीस:मनपा शिक्षक समृद्धी सहकारी पतसंस्थेचा वाद चिघळण्याची शक्यता

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त अकोला नगर पालिका शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेत झालेल्या लाखों रुपयांच्या अनियमिततेचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठाने अकोला महापालिका आयुक्त डॉ. कविता द्विवेदीसह उपनिबंधक कार्यालयातील दोघांना अशी तीन जणांना नोटीस बजावली आहे. येत्या तीन आठवड्याच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पतसंस्थाप्रकरणी वाद चिघळला असल्याची चर्चा मंगळवारी मनपा वर्तुळात होती.

अकोला महापालिकाअंतर्गत सेवा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेत निर्मिती केली. दीड कोटींची उलाढालापर्यत पोहोचलेल्या पतसंस्थेत 68 खातेदारांवर 64 लाखांचे थकीत आढळून आले होते. त्यामुळे पतसंस्था वादात सापडली. जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या लेखा परिक्षकांच्या अहवालामुळे 11 संचालकांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले.

पोलिस कारवाई झाल्याने महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. यातील काही जणांच्या फाईल्स त्यांच्या कार्यालयात पोचल्याने अजूनही काही कर्मचारी त्यांच्या रडारवर आहेत. दरम्यान लेखा परिक्षकांसह तिघांवरही न्यायालयीन आदेशान्वये गुन्हे दाखल झालेत.दरम्यान आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेले पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबूलाल मूर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यामुळे उच्च न्यायालयाने आयुक्तांसह तीन जणांना नोटीस पाठवुन तीन आठवड्याच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

5 फेब्रुवारी 2020 पासून जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी पुढाकार का घेतला नाही, अशी विचारणा देखिल न्यायालयाने केली आहे. आता उपरोक्त तिन्ही अधिकारी काय उत्तर सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अद्याप नोटीस बघीतली नाही

न्यायालयाची नोटीस टपालाद्वारे आली असेल. आज मी विविध कामांची पाहणी केली. त्यामुळे आलेले टपाल बघता आले नाही. त्यामुळे नोटीस मध्ये नेमके काय स्पष्टीकरण मागीतले आहे. ही बाब नोटीस वाचल्या नंतरच सांगता येईल. - कविता द्विवेदी, आयुक्त महापालिका अकोला.

बातम्या आणखी आहेत...