आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • High Court Notice To Three Including Municipal Commissioner; There Is A Possibility Of Escalating The Municipal Teacher Prosperity Cooperative Credit Union Dispute | Marathi News

महापालिकेच्या वर्तुळात चर्चा:मनपा आयुक्तांसह तिघांना उच्च न्यायालयाची नोटीस; मनपा शिक्षक समृद्धी सहकारी पतसंस्थेचा वाद चिघळण्याची शक्यता

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला नगर पालिका शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेत झालेल्या लाखोंच्या अनियमिततेचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या द्वि सदस्यीय खंडपीठाने मनपा आयुक्त कविता द्विवेदींसह उपनिबंधक कार्यालयातील दोघांना नोटीस बजावली आहे. तीन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. त्यामुळे पतसंस्थाप्रकरणी वाद चिघळला असल्याची चर्चा मंगळवारी मनपा वर्तुळात होती.महापालिकेअंतर्गत सेवा देणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निर्मिती केली.

दीड कोटीपर्यंत उलाढाल गेलेल्या पतसंस्थेत ६८ खातेदारांवर ६४ लाखांचे थकीत आढळले होते. त्यामुळे पतसंस्था वादात सापडली. जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या लेखा परिक्षकांच्या अहवालामुळे ११ संचालकांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिस कारवाई झाल्याने महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. यातील काही जणांच्या फाइल्स त्यांच्या कार्यालयात पोहाेचल्याने अजूनही काही कर्मचारी त्यांच्या रडारवर आहेत. दरम्यान लेखा परिक्षकांसह तिघांवरही न्यायालयीन आदेशान्वये गुन्हे दाखल झालेत. दरम्यान आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेले पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबूलाल मूर्ती यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.

त्यामुळे उच्च न्यायालयाने आयुक्तांसह तीन जणांना नोटीस पाठवून तीन आठवड्याच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ५ फेब्रुवारी २० पासून जबाबदार अधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी पुढाकार का घेतला नाही, अशी विचारणा देखिल न्यायालयाने केली आहे. आता उपरोक्त तिन्ही अधिकारी काय उत्तर सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नोटीस बघितली नाही
न्यायालयाची नोटीस टपालाद्वारे आली असेल. आज मी विविध कामांची पाहणी केली. त्यामुळे आलेले टपाल बघता आले नाही. त्यामुळे नोटीस मध्ये नेमके काय स्पष्टीकरण मागीतले आहे. ही बाब नोटीस वाचल्यानंतरच सांगता येईल.
कविता द्विवेदी, आयुक्त महापालिका अकोला.

बातम्या आणखी आहेत...