आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रोहना बॅरेज येथे होलिका दहन, जनजागृती; किन्नर गुरु नेहा गुरु दिलजान यांच्या हस्ते पेटवली होळी

मूर्तिजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्राम रोहना येथील उमा नदीवरील प्रकल्प गेल्या १३ वर्षांपासून रखडलेला असून हा उमा बॅरेज प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होणे गरजेचे असताना १३ वर्षाच्या कालावधी उलटून गेला. तरी अद्याप प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाची उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे अद्यापही हा प्रकल्प रखडला असून राष्ट्रशक्ती हमचालीस जनांदोलन संघटना या विरुद्ध २१ मार्चपासून जन आंदोलन छेडणार आहे.त्यानिमित्त जनजागृती करण्याकरता या ठिकाणी होलिकादहन कार्यक्रमाचे आयोजन किन्नर गुरु नेहा गुरु दिलजान यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते. यावेळी बॅरेज प्रकल्प रखडवणाऱ्या शासन व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. या ठिकाणी किन्नर गुरु नेहा गुरु दिलजान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यासोबतच राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव यांच्या अध्यक्षतेखाली होलिका दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक बंडू डाखोरे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, तालुकाध्यक्ष रोहित सोळंके, सुभाष राऊत, दीपक खंडारे, मुरली मुगल, सरपंच किशोर नाईक पोही, सरपंचा मनोरमा उघडे बोर्टा, सुनील वानखडे गणेश जोगळे, सुरेश हेंडजकर, बाळासाहेब सरोदे, कविता वर्घट, मिना वर्घट, शरद नंदे, स्वप्नील गणगणे, सतीश भगत, अप्पू मुळे, मुकेश वर्घट, विनायक मुळे, गोपाल खोपे तसेच ग्राम रोहणा, बोर्टा, माना, पोही येथील महिलावर्ग व गावकरी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...