आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार साेहळा:शिक्षकांचा सन्मान ही कायमच काँग्रेसची भूमिका ; नाना पटोले

अकाेला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या शिक्षक सेलच्या वतीने शनिवारी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिक्षक हे विद्यार्थी व समाज घडवण्यात मोलाची भूमिका पार पाडतात. सद्यःस्थितीत शिक्षकांना मात्र विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्येवर भाजप सरकार अतिशय असंवेदनशील असल्याचे पटोले म्हणाले. शिक्षकांचा सन्मान करणे ही कायमच काँग्रेसची भूमिका असून सदैव शिक्षकांसोबतच आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रसंगी केले.

राज्य शासनातर्फे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. मात्र त्यांच्या अटी व शर्थींमुळे अनेक शिक्षक उत्कृष्ट कार्य करूनही या पुरस्काराचे मानकरी ठरत नाहीत. त्यामुळे अशा शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात. १० सप्टेंबरला पुरस्कार वितरण साेहळ्याचे आयाेजन प्रमिलाताई आेक हाॅल येथे केले हाेते. माजी आ. लक्ष्मणराव तायडे, संजय राठोड, देवानंद पवार, श्याम उमाळकर, धनंजय देशमुख, अशोक अमानकर, डॉ. सुधीर ढोणे, जावेद अन्सारी, संजय बोडखे, प्रकाश तायडे, साजिदखान पठाण, मो. बदरुजम्मा, सचिन तिडके, डॉ. प्रशांत वानखडे पाटील, डॉ. झिशान हुसेन, चंद्रशेखर चिंचोलकर, गणेश काकड, रमाकांत खेतान, निखिलेश दिवेकर, नगरसेवक पराग कांबळे, मो. इरफान, मो. आसिफ , नौशाद भाई, फजलू पहेलवान, अभिलाष तायडे, आकाश कवडे यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

यांचाही सत्कार : अकोल्यात काँग्रेस शिक्षक सेलतर्फे काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सोबतच यावेळी प्रा. सुभाष गादिया व प्रा. डी. ए. पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश तायडे यांनी केले. सूत्रसंचालन अमरावती विभागीय काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. संजय देशमुख यांनी केले, तर डॉ. प्रशांत वानखडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...