आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांचा सत्कार; भंडारज बुद्रूक येथे प्रा. अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

पातूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारज बुद्रूक येथे युवकांना दारूचे व्यसन लागत असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार केला होता. यासाठी गावचे माजी सरपंच दीपक इंगळे, गोपीनाथ इंगळे, सम्राट तायडे, गुणसागर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्त गाव समितीसाठी महिलाचे पथक तयार करण्यात आले.

गाव व्यसनमुक्त करण्यासाठी येथील महिला रात्रंदिवस धडपड करत आहेत. दरम्यान यांची दखल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी घेतली असून, या आंदोलनातील रणरागिणी महिलांचा त्यांनी साडी चोळी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अंजली आंबेडकर यांचा सत्कार तंटामुक्त गाव समितीच्या महिला पथकांनी केला.

या कार्यक्रमाला राजेंद्र पातोडे, पुष्पा इंगळे, विनोद देशमुख, प्रभा शिरसाट, धर्यवर्धन फुंडकर, रूपाली गवई, अरुंधती शिरसाट, प्रमोद देडवे, सुनील फाटकर, निर्भय पोहरे, ओमप्रकाश धर्माळ, गजानन गवई, सचिन शिराळे, अर्चना डाबेराव, मंगला इंगळे व गावातील सरपंच राजेंद्र इंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराव सुरवाडे यांनी केले. आभार प्रदर्शन राजकुमार बोरकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच राजेंद्र इंगळे, दीपक इंगळे, माजी सरपंच गोपीनाथ इंगळे, गुनसागर इंगळे, सम्राट तायडे, श्रीकृष्ण इंगळे, शेषराव सुरवाडे, अनिल इंगळे, धर्माजी सुरवाडे यांनी घेतले. कार्यक्रमाच्या वेळी गावातील ग्रा. प. उपसरपंच विजया सुरवाडे, ग्रा. प. सचिव प्रज्ञा मगर, मिलिंद इंगळे, ग्रा. प. सदस्यगण व तंटामुक्ती महिला मंडळ यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...