आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:इंटरनॅशनलची सहीस फॉर्म द हार्टची पीन देवून गौरव, मान्यवरांची उपस्थितीसुभाष चांडक लायन्स क्लबच्यावतीने सन्मानीत

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब इंटरनॅशनलने सुभाष चांडक यांना सन्मानित केले व इंटरनॅशनलची सहीस फॉर्म द हार्ट ची पीन देवून त्यांचा गौरव केला.

लायन्स क्लबचे माजी डायरेक्टर राजू मनवानी यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रेसिडेन्ट डगलस एक्स अलेक्झांडर यांनी पाठवलेली लायन्स इंटरनॅशनलची सहीस फॉर्म द हार्ट ची पीन देवून सुभाष चांडक यांना सन्मानीत केले. डिस्ट्रीक्ट ३२३४ एच-२ च्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर यांनी २६ वर्षापासून सुरू असलेल्या हार्ट सर्जरी कॅम्प व लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउन्डेशन को-ऑर्डीनेटर म्हणून काम केल्याबदल स्पेशल अवॉर्ड देवून सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर दिलीप मोदी अध्यक्षस्थानी होते.

प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल डायरेक्टर व्ही. के. लडीया, माजी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ.नवल मालु, राजु मनवानी नरेंद्र भंडारी व मल्टीपल कौन्सील चेअरमन, विवेक अभ्यंकर, २२२३ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर पुरूषोत्तम जयपुरीया, व्हाईस गव्हर्नर सुनील देसह, गिरिष सिसोदीया डिस्ट्रीक्ट ३२३४ एच-२ चे सर्व माजी प्रांतपाल कॅबीनेट ऑफीसर क्लब अध्यक्ष सेक्रेटरी कोषाध्यक्ष असे ५०० लायन्स पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी अकोल्याचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रमाकांत खेतान, रिजन चेअरमन नितीन करवा, झोन चेअरमन मुरलीधर उपाध्याय, योगेश अग्रवाल, लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनचे अध्यक्ष मुकेश शर्मा, उपाध्यक्ष विवेक गावंडे, सचिव राजेश ठाकरे, प्रमोद चांडक, नरेश अग्रवाल, कैलास अग्रवाल, महेश मनवानी, माधुरी शर्मा, अनिता उपाध्याय, सुरेश सांगळोदकर, घनश्याम जोशी व सन २०२२-२३ चे रिजन चेअरपर्सन अश्विन बाजोरिया इलाइटचे अध्यक्ष जगदीश राठी, हार्मोनीच्या अध्यक्षा ज्योती गोयनका, दर्शन गोयनका, कन्नुभाई सयाणी, शोभा राठी, महेंद्र खेतान, डॉ. एन. के. माहेश्वरी, तारा माहेश्वरी आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.