आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल रॅली:घराेघरी तिरंगा अभियान; जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी रविवारी अकोला ते बार्शीटाकळी मार्गावरून जिल्हा प्रशासन व नेहरू युवा केंद्रातर्फे सायकल रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून रविवारी सकाळी सायकल रॅली सुरू झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नेहरू युवा केंद्र व एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या वेळी शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक मीरा पागोरे, सचिन पाटील आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होऊन कौलखेड, कान्हेरी सरपमार्ग, विश्रामगृह बार्शीटाकळीपर्यंत गेली. तेथून परत कान्हेरी सरपमार्ग जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अकोला-बार्शीटाकळी मार्गाने जाताना व येताना भारत माता की जयच्या घोषणा देत होते. त्यांना नागरिक प्रतिसाद देत होते.

फाळणी स्मृती दिन; प्रदर्शनाचे लोकार्पण
अकोला देशाच्या फाळणीत लोकांवर झालेले अत्याचार, त्यांचे संघर्ष व बलिदानाचे स्मरण व्हावे, याकरिता हुतात्मा स्मारक येथे प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाचे लोकार्पण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विभाजन विभीषीका स्मृती दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी सीईओ सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मनपा उपायुक्त पूनम कळंबे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक मीरा पागोरे आदी उपस्थित होते.

भारताच्या इतिहासातील अत्यंत दुःखद घटना म्हणजे भारताची फाळणी होय. या फाळणी दरम्यान लोकांवर झालेले अत्याचार, विस्थापिताचे दु:ख, तसेच अनेक बांधवाना आपले प्राण देखील गमवावे लागले. त्यांच्या या संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण व्हावे, याकरिता १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषीका स्मृती दिन म्हणून पाळला जातो. या स्मृती दिनानिमित्ताने हुतात्मा स्मारक, नेहरू पार्क, अकोला येथे नि:शुल्क प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात भारताच्या फाळणी बाबतचा घटनाक्रम सचित्र माध्यमातून मांडला असून, आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची माहिती देण्यात आली आहे. नागरिक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

७५ गिटार वादनातून गीतगायन
अकोला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी ७५ गिटार वादनातून राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतगायन व सुत्रनेती योगिक शुद्धीक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. अशा उपक्रमातून प्रत्येक दिवस नवीन शिकण्याची उमेद निर्माण होतात, असे मनोगत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासन, क्रीडा अधिकारी, अद्वैत गिटार ॲकेडमी व अजिंक्य फिटनेस पार्कच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे कार्यक्रम पार पडला. या वेळी आरडीसी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुचिता पाटोकार आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील ७५ गिटार वादकांद्वारे राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतगायन तसेच ७५ नागरिकांद्वारे सुत्रनेती योगिक शुद्धिक्रिया प्रात्यक्षिक सादर केले. योग प्रचार, गिटार वादक व सुत्रनेती योगिक क्रियात सहभागी होणाऱ्यांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण देशमुख व अजिंक्य फिटनेस पार्कचे धनंजय भगत यांनी केले, तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी मानले.

काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा
तेल्हारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पदयात्रेचे आयोजन केले गेले.

या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि हिवरखेड येथील चंडिका चौक येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत अकोला जिल्ह्यातील अनेक पक्षश्रेष्ठींनी हजेरी लावल्यामुळे तेल्हारा तालुक्यात काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा डॉ. संजीवनी बिहाडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक बिहाडे, जि.प. सदस्य गजानन काकड, तेल्हारा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकोडे, श्यामशील भोपळे, अशोक घाटे, तेल्हारा महिला काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्षा रझिया पटेल, अफरोज, विजय जायले, उमेश टापरे, देविदास चाफे, गजानन मुंशी, जमीर, मेहबूब, साजिद, फारुख, समीर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...