आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरोघरी तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी शनिवारी प्रमुख मार्गांवरुन युवक युवतींची रिले दौड आयोजित केली. हे अभियान देशात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी या कालावधीसाठी घराेघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
दरम्यान ६ ऑगस्टला दाैडचे आयाेजन केले. या दौडने नागरिकांचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख मार्गांवरुन जाताना हे युवक युवती भारत माता की जय च्या घोषणा देत होते. त्यांना नागरिक प्रतिसाद देत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीताने या दौडचा समारोप करण्यात आला.
अशी झाली सुरूवातः रिले दाैडला जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, एसडीआे डॉ. नीलेश अपार, गजानन महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. या रिले दौडला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. दौड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन निघून अशोक वाटिका, सिव्हिल लाइन रस्त्यावरुन, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, जठारपेठ चौक, सातव चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चाैक (रेल्वेस्टेशन), शिवाजी महाविद्यालयमार्गे अशोक वाटिका व उड्डाणपुलावरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे या दौडचा समारोप करण्यात आला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.