आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाची हिंदू गर्व गर्जना यात्रा सुरु:दसरा मेळावा कसा हाेताे हे महत्त्वाचे : मंत्री भुमरे

अकाेला8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत दसरा मेळावा कुठे हाेताे याला नव्हे तर कसा हाेताे, याला महत्त्व आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा राेहयाे मंत्री संदिपान भुमरे शनिवारी पत्रकारांशी बाेलताना म्हणाले. मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंत्री, आमदार, शिवसैनिकांनाही भेट देत नव्हते, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र साेडले. भुमरे हिंदू गर्व गर्जना या यात्रेच्या निमित्ताने अकोल्यात आले हाेते.

खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा करीत शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कची मागणी केली हाेती. मुंबई मनपाने दाेन्ही बाजूंचा अर्ज फेटाळला हाेता. मात्र उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिल्यानंतर शनिवारी अकोल्यात आलेल्या शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले. पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी त्यांनी हिंदू गर्व गर्जना या संपर्क यात्रेला संबाेधित केले. या वेळी मंचावर अर्जुन खाेतकर, गाेपीकिशन बाजाेरिया, आमदार विप्लव बाजाेरिया हाेते.

कोर्टाचा निर्णय मान्यच
शिवाजी पार्क येथे हाेणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय मान्यच आहे. सर्वाेच्च न्यायालयात धाव घेण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील, असेही रोहयो मंत्री संदिपान भुमरे म्हणाले. वांदे येथील एमएमआरडीएच्या मैदानावर आमच्या मेळाव्यासाठी प्रचंड जनसमुदाय उसळणार असून, यासाठी बीकेसीने परवानगी दिल्याचेही भुमरे पत्रकारांशी बाेलताना म्हणाले.