आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी:शेकडो एकरवरील खरीप हंगामातील पिके वाणी किड्याकडून फस्त

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील शेकडो एकर वरील पिके वाणीने कुरतडून फस्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी आणि लागवडीची वेळ आली आहे. दुसऱ्यांचा पेरणी करूनही पिकांवर वाणीचा हल्ला सुरूच आहे. त्यामुळे बियाणे, खते, पेरणी, मजुरी आणि अंतर्गत मशागतीवरच केलेला खर्च मातीत गेला आहे. आता रोपांत आलेल्या पिकांची पाने आणि शेंडे कुरतडून पिकांची घासाची होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान ठोस उपाययोजनांबाबत कृषी विभागाकडून सूचना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

पश्चिम विदर्भात गेल्या पाच वर्षांपासून वाणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र कृषी विभागाने अद्यापही या विषयावर शेतकऱ्यांमध्ये उपाययोजनांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केल्याचे दिसत नाही. त्यामुळे अनेक भागात शेतकरी दुबार, तार पेरणीच्या संकटाला सामोरे जात आहेत. विशेष करून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात खाणीपासून पिकांचे होणारे नुकसान अधिक आहे. दरम्यान वाणीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात कृतीचे संबंधित विभाग आणि अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना दिल्याचे डॉ. पंजाब राव देशमुख कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात येते. मात्र हंगामाच्या प्रारंभी वाणीचा प्रादुर्भाव कसा रोखावा, यासंदर्भात योग्य मार्गदर्शन नसल्याने अक्षरश: वाणी वेचून शेताबाहेर नष्ट करावे लागले, असे शेतकरी सांगतात.

बाळापूर तालुक्यात अनेक भागात वाणीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. भौरद, गायगाव, निमकर्दा शिवारातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. गावगाव येथील माणिकराव थोटे यांनी यंदा दुसऱ्याचे ९ एकर शेत पेरणीसाठी घेतले. खरीपाच्या प्रारंभी ९ एकरवर कपाशीची लागवड केली. त्यासाठी त्यांना ३० हजार रुपयांचा खर्च आला. मात्र संपूर्ण शेतच वाणीने कुरतडून फस्त केले.

औधषांची मागणी
वाणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारण्यासाठी आणि वाळूमध्ये मिश्रण करून शेतात फेकण्यासाठी दाणेदार स्वरूपातील औषधे उपलब्ध आहेत. पिकाची अवस्था आणि नुकसान पाहून शिफारशीनुसार शेतकऱ्यांना औषधे दिली जातात. अनेक शेतकऱ्यांकडून या औषधांची मागणी होत आहे. - रवी ग्रामकर, कृषी केंद्र व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...