आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Husband Of Female Sarpanch Asked For Bribe 46 Thousand Rupees Were Asked From The Contractor To Pay The School Renovation Construction Bill, Caught In ACB's Net

महिला सरपंचाच्या पतीने मागितली लाच:शाळा नूतनीकरण बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदारास मागितले 46 हजार रुपये

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत अकोट तालुक्यातील ग्राम जऊळखेड येथील ग्रामसेवक व सरपंच महिलेच्या पतीने शासकीय कंत्राटदारास 46 हजार रुपयांची लाच मागितली आहे. यापैकी 40 हजार रुपये लाच घेतांना सरपंच पतीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री उशिरा ग्रामसेवकासह सरपंच पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या अकोट तालुक्यातील ग्राम जउळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणाचे बांधकाम शासकीय कंत्राटदाराने पूर्ण केले. त्याचे बिल 4 लाख 66 हजार 132 रुपये अदा करावयाचे होते.

रंगेहाथ पकडले

सरपंचपती आशिष दत्तात्रय निपाणे (वय 35) जउळखेड यांच्यासह ग्रामसेवक उत्तम देविदास तेलगोटे (वय 52) वर्ष रा. खानापूर वेस ता. अकोट या दोघांनी दहा टक्के प्रमाणे ४६ हजार रुपये लाच मागितली. त्यातील 40 हजार रुपये लाच घेतांना सरपंच पती आशिष निपाणे यास अकोट तालुक्यातील करोळी फाट्यावरील इस्सार पेट्रोलपंपावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ग्रामसेवक फरार

याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंचपती व ग्रामसेवकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून सरपंचपतीस अटक केली आहे तर ग्रामसेवक फरार असल्याने त्याचा शोध सुरु आहे. एसीबीचे पोलिस निरिक्षक नरेंद्र खैरनार व सहकाऱ्यांकडून आरोपी ग्रामसेवकाचा शोध सुरु आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक यु.व्ही. नामवाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...