आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी माझे कर्तव्य बजावले; आता तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा:आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या दिल्या कान पिचक्या

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी फार मोठे काही केले नाही. मी माझे कर्तव्य बजावले. मात्र आता तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. उशिरा येणे, फाईल्स दडपुन ठेवणे, कर्तव्यात कसुर करणे, हा सगळा प्रकार आता बंद करा. एखादवेळी झाडाझडतीत असा प्रकार आढळून आल्यास मी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबीत करने, अशा शब्दात आयुक्त कविता द्विवेदी यांनी कर्मचाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. निमित्त होते, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्या बद्दल आयुक्तांचे आभार मानायला गेलेल्या प्रसंगाचे. या प्रकारामुळे आभार मानायला आलेल्या कर्मचाऱ्यांचे चेहरे मात्र पडले.

आयुक्त कविता द्विवेदी यांनी महापालिकेचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ जुळवुन आणला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गेल्या सव्वा वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन दिले जाते. एकीकडे वेतनाची गाडी रुळावर आणताना दुसरीकडे सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेतन देताना पाच हजार रुपये जमा केले जातात. तर रजारोखीकरण, महागाई भत्ता आदी सर्व प्रकारची देणी आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला. महासभेने हा प्रस्ताव मंजुर केल्या नंतर आयुक्तांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर राज्य शासनाने महापालिकेला सातवा वेतन आयोग लागु करण्याची मंजुरी दिली. सातवा वेतन आयोग लागु झाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

त्याच बरोबर आयुक्तांचे आभार मानले. मात्र सार्वजनिक सुटीमुळे आयुक्त महापालिकेत आल्या नव्हत्या. 12 सप्टेंबर रोजी त्या कार्यालयात आल्या नंतर कर्मचारी पुष्पगुच्छ घेवून त्यांचे आभार मानायला गेले. आयुक्तांनी पुष्पगुच्छ स्विकारले तसेच आभारही स्विकारले. मात्र यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कान पिचक्या घेतला.

आयुक्त म्हणाल्या, मी नियमित वेळेवर कार्यालयात येते. तुमच्या पैकी किती जण नियमित वेळेवर कार्यालयात हजर असतात. जे काही वेळेवर येतात, ते नंतर चाट मारतात. विना कारण तुमच्या टेबलवर फाईल पडलेली असते. हा प्रकार सर्वथा चुकीचा आहे. तुम्हालाही तुमच्या कर्तव्याची जाणिव असणे आवश्यक आहे. मी सातवा वेतन लागु केला म्हणजे काय? तर मी देखिल माझे कर्तव्य पार पाडले. आता तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा, म्हणजे खऱ्या अर्थाने मला आनंद होईल.

तर निलंबित करने

मी संपूर्ण कार्यालयाची केव्हाही झाडाझडती घेवू शकते. ही झाडा झडती घेताना जे कर्मचारी कर्तव्यात कसुर करतील, त्यांना मी थेट निलंबित करेन, असा इशाराही आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला.

बातम्या आणखी आहेत...