आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना त्रास:प्रकरणाचा सात दिवसात निपटारा न‎ केल्यास कर्मचाऱ्यावर होईल कारवाई‎

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांच्या कामासह‎ प्रशासकीय कामाच्या फाइल्सचा‎ (प्रकरणाचा) निपटारा सात दिवसात न‎ केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली ‎ ‎ जाईल, अशी सूचना आयुक्त, प्रशासक‎ कविता द्विवेदी यांनी केली आहे.‎ मनपातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन‎ दिले जात असताना, त्यांना पाचव्या, सहाव्या ‎ ‎ वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, अन्य‎ थकीत देणीही दिली आहे. मात्र काही‎ कर्मचाऱ्यांकडून अनेक प्रकरणांच्या‎ फाइल्सचा निपटारा दोन ते तीन आठवडे‎ कधी-कधी महिने होत नाही. यामुळे कामास‎ विलंब होतो. विविध प्रकारच्या कराचा भरणा‎ करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा‎ लागतो.

यामुळे मनपाची बदनामी होते. याचा‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ विचार करुन आयुक्त, प्रशासक कविता‎ द्विवेदी यांनी प्रकरणाच्या फाईल्सचा निपटारा‎ करावा. हा निपटारा सात दिवसात न केल्यास,‎ विलंब होण्याचे महत्वाचे कारण नसल्यास‎ संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई‎ करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक‎ कविता द्विवेदी यांनी दिला आहे.‎यापूर्वीही अनेकदा सूचना केल्या‎ यापूर्वीही आयुक्त, प्रशासकांनी विविध प्रकरणांत‎ कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या. मात्र‎ त्या कागदावरच राहिल्या. त्यामुळे आता पुन्हा‎ एकदा दिलेली सूचना ही कागदावरच राहणार की‎ खरोखरच प्रकरणांचा निपटारा केला जाणार?‎ ही बाब येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.‎

यापूर्वीही अनेकदा सूचना केल्या‎ यापूर्वीही आयुक्त, प्रशासकांनी विविध प्रकरणांत‎ कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या. मात्र‎ त्या कागदावरच राहिल्या. त्यामुळे आता पुन्हा‎ एकदा दिलेली सूचना ही कागदावरच राहणार की‎ खरोखरच प्रकरणांचा निपटारा केला जाणार?‎ ही बाब येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.‎