आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाईचे आव्हान:नाला सफाईचे काम अनवधानाने राहिले असल्यास संपर्क साधा, अकोला महापालिकेचे आवाहन

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा सुरू झाला आहे. शहरातून जाणाऱ्या नाल्यात काटेरी झाडेझुडपे, गवत वाढले आहे. नाल्यात गाळ साचला आहे. त्यामुळे अकोला महापालिकेच्यावतीने नाला सफाई सुरू आहे. जर शहरातील काही ठिकाणी नाला सफाईचे काम अनवधानाने राहिले असल्यास त्याची माहिती महापालिका प्रशासनाला द्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

संबंधित माहिती झोन कार्यालय, आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्ष किंवा मनपाच्‍या amcakola.in या वेब साइटवर द्यावी. तसेच शहरामध्‍ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्‍यास मनपा नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष दूरध्वनी क्रमांक 0724-2434460,0724-2432102 आणि 0724 2432103 तसेच टोल फ्री क्रमांक 18002335733 यावर संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

पाइप काढून नाल्याची सफाई

दरम्यान राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पासून ते शिवसेना वसाहतकडे जाणाऱ्या 125 फूट लांबी आणि 25 फूट रूंदीच्‍या मोठ्या नाल्‍यावर आरसीसीचे पाइप टाकल्याने नाल्याचा प्रवाह थांबला होता. महापालिकेने हे पाईप काढून नाल्याची सफाई केली. यामुळे गंगा नगर आणि किराणा बाजार येथे पावसाचे पाणी साचले होते. यावेळी पश्चिम झोन क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, नगररचनाचे कनिष्‍ठ अभियंता राजेंद्र टापरे, आरोग्‍य निरीक्षक अमर खोडे आणि अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...