आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Ignorance Of Uposhan Temple Committee To Perform Vajralep Vishwa Warkari Sena Of Panduranga's Idol; Statement Given To Vitthal Rukmini Temple Committee

पांडुरंगाच्या मूर्तीचा वज्रलेप निघाला:मंदिर समितीचे दुर्लक्षामुळे विश्व वारकरी सेना आक्रमक; उपोषणास बसण्याचा इशारा

अमोल डांगे । अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायाचा व्रज्वलेप निघाला, असून मंदिर समितीकडून दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप विश्व वारकरी सेनेला केला आहे.

निघालेला व्रज्वलेप लवकर लावण्यात यावा; अन्यथा विश्व वारकरी सेनेतर्फे आमरण उपाेषण करण्यात येईल, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे.

पंढरपूर हे भक्तांचे आराध्य दैवत आहे. दक्षिण काशी असणारे श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री विठ्ठलाच्या व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झिज होऊ नये, यासाठी गत वर्षापूर्वी त्या मूर्तीस व्रज्वलेप करण्यात आला होता. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या सर्व देखरेखीखाली हा व्रज्वलेप करण्यात आला होता. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच श्री क्षेत्र पंढरपूर येथील मंदिरातील रुक्मिणी मातेच्या पायाचा वज्र लेप निघाला होता.

गतवर्षी दाेन महिन्याच्या आधी रुक्मिणी मातेच्या पायाला वज्र लेप लावण्यात आला. मात्र, आता पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाची झिज, डाव्या बाजूच्या पायाचे थोडे थोडे टवके निघाले आहे. त्यामुळे श्री पांडुरंगाच्या मूर्तीची झीज पुन्हा एकदा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. ही झिज तातडीने थांबवावी व श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व वारकरी भक्तांच्या भावनांशी होणारा खेळ थांबवावा, असे निवेदन विश्व वारकरी सेनेतर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुदलवार यांना देण्यात आले.

यावेळी विश्व वारकरी सेनेचे, संस्थापक अध्यक्ष हरी भक्त परायण गणेश महाराज शेटे, तुकाराम महाराज भोसले, महादेव म. इंगोले, गजानन म. दहीकर, संतोष म. वाघोळकर, नामानंद म. जाधव, माऊली म. सुरडकर, हरिभाऊ म. लोंढे, नानासाहेब म. पाटील, सुरेश म.बडे, गीतांजलीताई अभंग, सुरेंद्र महाराज नागपूरकर आदि सर्व मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र काढण्याची परवानगी द्यावी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री पांडुरंगाच्या मूर्तीचा छायाचित्र काढण्याची परवानगी आम्हास मिळावी, अशी मागणी यावेळी गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. मात्र, अद्याप फोटो काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. एवढा खर्च करून लावलेला जर वज्रलेप सहजासहजी निघत असेल तर हा भाविकांच्या भावनेशी चालू असलेला खेळत म्हणावा लागेल. आगामी नवरात्र उत्सवामध्ये (घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीच)विश्व वारकरी सेनेच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना व सर्व भाविक भक्तांना सोबत घेऊन नामदेव पायरीच्या जवळ उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...