आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर जप्त:मोर्णा नदीतून रेतीचा अवैध उपसा; ट्रॅक्टर जप्त

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्णा नदीत अवैध रेती उपसा करून सांगवी मोहाडीकडून अकोल्याकडे येत असलेला ट्रॅक्टर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी जप्त केला. तीन आरोपीवरही कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष पथकास माहिती मिळाली, की सांगवी मोहाडी येथील प्रमोद पाटोळे हा एमएच ३० जे ७४०० या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये मोर्णा नदीपात्रातून विनापरवाना उपसा करून त्याची विक्री करण्यासाठी सांगवी मोहाडी येथून अकोलाकडे येत आहे. या माहितीवरून सुकोडा फाट्या जवळील जयस्वाल बिअर शॉपी जवळ नाकाबंदी करून ट्रॅक्टर थांबवण्यात आला.

त्यातील एक चालक व मालक प्रमोद रतन पाटोले हा ट्रॅक्टर सोडून पळून गेला. ट्रॅक्टर बाजूला घेऊन ट्रॅक्टरमधील ओकेश चंद्रमणी शिरसाट (३० रा. भोड), महेंद्र गौतम शिरसाट (३८ रा. भोड) या दोघांना ताब्यात घेतले. त्याने पळून गेलेला व्यक्ती हा प्रमोद रतनराव पटोले (४०, रा. सांगवी मोहाडी) असून, ट्रॅक्टरही त्याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. ट्रॅक्ट

बातम्या आणखी आहेत...