आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:अयोध्येला गेलो नाही म्हणून नाराज नाही, मीही रामभक्तच; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे अकोल्यात वक्तव्य

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण अयोध्येला गेलो नाही याचा अर्थ आपण नाराज आहोत असा होत नाही. मीही रामभक्तच आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते अकोल्यात वादळी वारा व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता सोमवारी माध्यमांशी बोलत होते.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार व शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार नव्हते. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की, देवदर्शन करणे हे चुकीचे नाही. धनुष्यबाणाचे अयोध्येत मी पूजन केले. भक्तांवर राजकारण केले जात आहे हे चुकीचे आहे. मी अयोध्येला गेलो नाही म्हणजे नाराज नाही. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यासाठी मी दौरा काढला. हे कामही अयोध्येसारखेच काम आहे. मध्यावधी निवडणुकांच्या परिस्थितीवर बोलताना पुढचे इंडिकेटर काय आहेत हे आपण सांगू शकत नाही. त्यासाठी मी मोठा पुढारी नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर उपस्थित होते.