आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला तालुक्यातील दहिहंडा येथील लेवडी नाल्याचा काठ पुरामुळे खचल्यामुळे सुमारे ४२ कुटुंब बाधित झाली आहेत. त्यामुळे या बाधित कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याच्या सूचना लाेकप्रतिनिधींनी प्रशासनाला केल्या. आवश्यक सर्वेक्षण करून दोन दिवसात अहवाल तयार करण्याचेही सूचित केले.
दहिहंडा परिसरातील लेवडी नाल्याचा ५० फुटापेक्षा अधिक उंच असलेला काठ अतिवृष्टी व पुरामुळे तसेच नाल्याचा प्रवाह बदलल्याने सुमारे ४२ कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. अलीकडे झालेल्या अतिवृष्टी एक मुलगा खचलेल्या नाल्याच्या पात्रात पडून जबर जखमी झाला हाेता. दरम्यान शुक्रवारी आमदार रणधीर सावरकर यांच्यासह लाेकप्रतिनिधींनी नाल्याची पाहणी केली. बाधित होणाऱ्या कुटुंबीयांसोबत आमदार सावरकर यांनी संवाद साधला.
यावेळी तहसीलदार सुनील पाटील, जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता वसूलकर, अभियंता घुगे, अभियंता कासर, तलाठी देशपांडे यांच्यासह यावेळी गोविंद गोयंका, सरपंच गोविंद झाडे, गजेंद्र पांडे, दिलीप मिश्रा, आशीष मगर, संतोष मोहोडकर, माधव मगर, रमेश थोरवे, मनोज अग्रवाल, प्रवीण पोटे, संजय आठवले, श्रीकृष्ण भोंडे, साहेबराव पखाले, राजीव भोंडे, संतोष भोंडे, सुनील भोंडे, अर्जुन अंकुरकर , सुरेश काळपांडे, रोहित भोंडे, अनील डहाके, शिवम दीक्षित मंगेश निवाने, रामकृष्ण बाभूळकर, अमोल अंबुसकर, गजानन गोतमारे, अनील अस्वार, राजीव लाड आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.