आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेकरहो, येथे द्या बाप्पांना निरोप:प्रशासनासह स्वयंसेवी संघटनांकडून विसर्जन व्यवस्था; कृत्रिम घाटांचीही केली निर्मिती

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गणेरायाचे स्वागत अगदी जल्लोषात करण्यात आले आणि आता त्याच बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. शुक्रवारी (09 सप्टेंबर) अनंत चतुर्दशी असल्याने लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. यासोबतच शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विधिवत, संगीतमय वातावरणात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजपच्या वतीने 6 ठिकाणी व्यवस्था

भाजपाच्या वतीने जठारपेठ, रामदासपेठ, तापडीया नगर, नेहरू चौक, मोठी उमरी, राऊतवाडी, न्यु तापडीया नगर, खरप, तसेच प्रभाग 6 व प्रभाग क्र. 3 च्या भाविकभक्तांच्या सोयीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भारत विद्यालय समोर, तापडियानगर येथे गणपती विसर्जनासाठी तलाव निर्माण केले आहेत. गणपती विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेश मूर्ती विसर्जन कृत्रिम घाट व मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन, मूर्ति पूजा व्यवस्था 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते संध्या. 6 वाजेपर्यंत सुविधायुक्त निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोट फैल येथे कृत्रिम कुंड

गणेश विसर्जनच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेश विसर्जनासाठी अकोट फैल परिसरात नागरिकांसाठी कृत्रिम घाटची व्यवस्था भाजप युवा मोर्चा उत्तर मंडळच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानिक अकोट फैलमधील हनुमान चौक, लाडीस फैल, परदेशी पुरा, मोची पुरा, संत कबीर नगर, बापूनगर, शंकरनगर, भोईपुरा, साधना चौक, आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे नगर, पिपळफैल, टायगरवाडी, भिम चौक तसेच प्रभाग क्र.2 च्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी हनुमान मंदिर समोर हनुमान चौक अकोट फैल येथे विविध सुविधायुक्त गणपती विसर्जनासाठी हा कृत्रिम तलाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश भक्तांनी हनुमान मंदिर समोर हनुमान चौक अकोट फैल येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी स.9 ते संध्या 4 वाजेपर्यंत विविध सुविधायुक्त असणाऱ्या या कृत्रिम गणेश कुंडाचा गणेश भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन नीतीन नरेश राऊत व समस्त मित्र परिवाराने केले.

सातव चौकात गणेश विसर्जन कुंड

प्रभाग तीनमध्ये नीलेश देव मित्र मंडळाच्या वतिने जठारपेठ, न्यू तापडिया नगर, ज्योती नगर, तापडिया नगर, उमरीचा काही भाग या ठिकाणच्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदा सातव चौकात गणेश विसर्जन कुंड उपलब्ध राहणार आहे. अ‍ॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प तसेच नीलेश देव मित्र मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...