आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Implementation Of Solar Power Project In Akola Stalled Due To Meda's Negligence, So Far The Municipality Has Suffered A Loss Of Two Crores

अकोल्यात सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वितीकरण रखडले:मेडाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत मनपाला पावणे दोन कोटींचा फटका

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महान व शिलोडा परिसरातील सौैर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होवूनही केवळ नेट मिटरींगमुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे. डिसेंबर 2021 मध्ये प्रकल्प पूर्ण झाला परिणामी आता पर्यंत महापालिकेचे पावणे दोन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत शासनाकडे पाठण्यात आला होता. 1400 किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी 990 केव्ही क्षमतेचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारण्यात आला. मेडा ने हे काम भेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेटमिटरींगचे काम न झाल्याने कार्यान्वयन रखडले होते. दरम्यान महान जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प रोहित्रातील वाढीव दुरुस्ती (उपकरण बदलणे) खर्चात वाढ झाल्याने या खर्चाच्या सहमतीचे पत्र मेडाने महापालिकेस मागीतले. महापालिकेने मेडा ला सहमती पत्र पाठवले. पत्र पाठवुन तीन महिन्याचा कालावधी होत आला आहे. मात्र अद्यापही नेट मिटरींगचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दुरुस्तीच्या खर्चापैकी 36 लाख रुपयाचा भरणा केला

महापालिकेने दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 36 लाख रुपयाचा भरणा केला आहे. मात्र खर्चात वाढ होवून हा खर्च 75 लाख रुपये होईल. यामुळेच वाढीव खर्चाबाबतचे सहमती पत्र मेडाने मागवले होते. ते सहमती पत्र महापालिकेने दिले आहे.

आतापर्यंत पावणे दोन कोटीचे नुकसान

सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील 15 लाखांचे तर शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्रातील 3 लाख रुपयाचे विद्युत देयकाचा भरणा मनपाला करावा लागत आहे. डिसेंबर मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर जानेवारी महिन्यात नेट मिटरींगचे काम होणे अपेक्षित होते. प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने आता पर्यंत महापालिकेला पावणे दोन कोटी रुपयाचा चुना मेडामुळे लागला आहे. या अनुषंगाने मेडाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होवू शकला नाही.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

महापालिकेच्या विविध योजनांमध्ये लक्ष घालणाऱ्या लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या या आर्थिक नुकसानाकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मेडाच्या अधिकाऱ्यांशी बोलून सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वितीकरण शक्य आहे. मात्र लोकप्रतिनिधींनीही तोंडावर बोट ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...