आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विधवा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी ; सामाजिक कार्यात सामावून घेणार

वनोजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम येडशी येथे १५ ऑगस्ट रोजी श्री संजय विठ्ठलराव बारड यांच्या अध्यक्षतेखाली मौजा येडशी येथे ग्रामसभा घेण्यात आली होती. सभेत विधवा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या मंजूर ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शनिवार, १० सप्टेंबर पासून गावात सुरू करण्यात आली असल्याची माहिती सरपंचांनी दिली. भारतीय संविधानाने भाग चार कलम ५१ अ नुसार मूलभूत कर्तव्यांच्या यादीत महिलांना उणेपणा आणणाऱ्या प्रथा नागरिकांनी पाळू नये व राज्यसंस्थेने वेळोवेळी कायदे करून या प्रथा व चालीरीती बंद करण्याचे सांगितले आहे यावरून स्त्रियांना समान दर्जा व सर्व बाबतीत समानता असावी असे संविधानास अभिप्रेत आहे व संविधानाच्या आदर्शाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आजही गावात अजाणतेपणे वा अज्ञानापोटी महिलांना कमी लेखण्याची प्रथा गावकरी पाळताना दिसत आहे व त्यामुळे महिला-महिलांमध्ये भेद निर्माण होऊन विधवा स्त्रियांना

समाजात दुय्यम स्थान मिळत असून पर्यायाने विधवा भगिनींना अपमानास्पद वागणूक मिळताना दिसत आहे म्हणून या ग्रामसभेत महिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक कमी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.या ठरावात विधवा व सुवासिनी असा भेद नष्ट करून सर्व विधवांना इतर स्त्रियांप्रमाणे सामाजिक व धार्मिक कार्यात समाविष्ट करून घेण्यात येत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, जोडवे काढणे,बांगड्या फोडणे,मंगळसूत्र घालण्यास मनाई असणे अशा व इतर कमी लेखणाऱ्या प्रथा गावातून बंद करण्यात येत आहे.

स्त्रियांना समान संधी या नात्याने प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देऊन राजकीय पदावर महिला असताना पतीने अजिबात हस्तक्षेप न करता पदावरील स्त्रीला तिच्या सद्विवेक बुद्धीने निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येत आहे. या तिन्ही मुद्द्यांवर एकमत होऊन यापुढे या प्रथा गावातून समूळ नष्ट करण्याचा व यानंतर कोणीही पाळणार नसल्याचे सरपंचांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...