आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागेच्या वादातून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना शनिवारी (30 जुलै) 6 वर्षींची कारावासाची शिक्षा सुनावली. पुरुषोत्तम दयाराम गाडगे, संतोष दयाराम गाडगे, उमेश दयाराम गाडगे, गोपाल श्रीराम गाडगे व खंडू भाऊराव गाडगे (सर्व रा. टाकळी खोजबळ, तालुका बाळापूर) असे आरोपींचे नावे आहेत.
जागेवरून वाद
तक्रारदार प्रवीण काशीराम साबे यांच्या परिवाराचे व आरोपींमध्ये जागेवरून वाद सुरू होता. 30 मे 2015 रोजी आरोपींनी फिर्यादी प्रवीण यास त्यांचे घरासमोर लोखंडी पाईप, काठ्यांनी मारहाण केली. जीवघेणा हल्ला केला. या उरळ पोलिस स्टेशन येथे भादंविचा कलम 147, 148,307,504, 506, 450 सह कलम 149 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायायात झाली. न्यायालयाने 30 जुलै रोजी निकाल दिला. आरोपींना दोषी ठरवले व विविध कलमांन्वये शिक्षा ठोठावली. तसेच जखमी प्रवीण व सचिन साबे यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई आरोपींनी द्यावी असाही आदेश जारी केला. याप्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशीष आर. फुडकर व श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.
अशी सुनावली शिक्षा
कलम 147, 148,307, 504, 506, 450 सह कलम 149 अंतर्गत दोषी ठरवून कलम 147, 148 सहकलम 149 अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. कलम 307 सहकलम 149 अंतर्गत 6 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे सश्रम कारावास भोगावा लागेल. कलम 504 व 506 सहकलम 149 अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महीने सश्रम कारावास. कलम 450 सहकलम 149 अंतर्गत 4 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा भोगावी लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.