आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवती बेपत्ता:एकाच महिन्यात 2375 युवती बेपत्ता, 18ते 30  वयोगटातील महिलांचे हरवण्याचा प्रमाण राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत अधिक

अकोला | दिलीप ब्राह्मणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ मार्च ते १ एप्रिल या एका महिन्यात राज्यातून १८ ते ३० वयाेगटातील २,३७५ युवती बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस या संकेतस्थळावर मिसिंग पर्सनमध्ये या नोंदी आहेत. यातील बहुतांश महिलांचा शोध लागला असला तरी बेपत्ता झाल्याचा आकडा मोठा आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.

१८ ते ३० वयोगटातील महिलांचे हरवण्याचा प्रमाण राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत अधिक आहे. पाठोपाठ विदर्भाच्या दहा जिल्ह्यात ५९० च्या जवळपास युवती बेपत्ता झाल्या आहेत. तर पश्चिम महाराष्ट्राचा आकडा ६३३ आहे. सर्वाधिक कमी आकडा हा मराठवाड्याचा आहे.

एकट्या अहमदनगर जिल्ह्यातून ११५ युवती बेपत्ता झाल्या आहेत. त्यापाठोपाठ नागपूर शहर, नाशिक, कोल्हापूर, यवतमाळचा नंबर लागतो. मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळून नेणे, प्रेमप्रकरण, मुलींची विक्री असे प्रकार वाढले आहेत. अल्पवयीन मुली हरवल्या तर अपहरणाच्या गुन्ह्याची पोलिस नोंद घेतात. तर युवती हरवल्यास पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद कली जाते. अशा मुलींचे नंतर समुपदेशन करणे जिकिरीचे बनते.

महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. मिरगे म्हणतात...
मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग अंतर्गत एका देशातून दुसऱ्या देशात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विकण्याचे प्रमाण वाढलेले आहे. राजस्थान, हरियाणामध्ये लग्नासाठी मुलींना विकल्या जाते. मुंबई, हैदराबाद, बंगळूरू, दिल्ली अशा ठिकाणी देह व्यापारासाठी तर अमेरिका व इंग्लंड येथे घरकामासाठी महिला विकल्या जातात. मुलीला प्रेमात पाळायचे, फूस लावायची, तिला नटी बनवतो, लग्न करतो, नोकरी देतो असे आमिष दाखवायचे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विकायचे. तिला घरी नेऊन मोलकरणी सारखे वागवण्याचे प्रमाण वाढले आहे. काही जाती जमातींमध्ये उपवर मुली मिळत नाहीत. त्यामुळे मुलींच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

सर्वाधिक बेपत्ताची नाेंद (आकडे १८ ते ३० वयोगटातील )
जिल्हा बेपत्ता
बृहन्मुंबई २६४
पुणे १९७
नाशिक १६४
ठाणे १५०
अहमदनगर ११५
नागपूर शहर ९३
यवतमाळ ९०
जळगाव ७८
औरंगाबाद जिल्हा ६९
बुलढाणा ५०
अकोला २५

विभागनिहाय बेपत्ताच्या नाेंदी :
विदर्भ- ५९०,
प.महाराष्ट्र- ६३३,
कोकण-मुंबई- ६२४,
उ. महाराष्ट्र - २९७,
मराठवाडा - २०१.

बातम्या आणखी आहेत...