आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला अकाेल्यातही दिवसेंदिवस विराेध वाढतच असून, साेमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रेल्वे राेखून धरली. यावेळी आंदाेलकांनी केंद्र सरकारच्या विराेधात घाेषणा दिल्या. पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अग्निपथ अंतर्गत जाहीर केलेल्या अग्निवीर योजनेला अनेक राज्यात विराेध हाेत आहे. या योजनेनुसार इंडियन आर्मीमध्ये तरुणांना 4 वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेनुसार दरवर्षी 46 हजार युवकांची निवड करण्यात येणार आहे. चार वर्ष संपताना त्यापैकी 25 टक्के युवकांना सैन्यदलात नोकरी मिळेल. इतर युवकांना चार वर्षांचा कालावधी संपताना जवळपास 11 लाख रुपये मिळणार अाहेत.
दरम्यान या याेजनेला विद्यार्थी काँग्रेसनंतर आता राष राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उडी घेतली आहे. 20 जून राेजी सहकारनजीकच्या रेल्वे रुळावर धाव घेत नांदेडकडे जाणारी रेल्वे राेखून धरली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विराेधात घाेषणा दिल्या. तसेच ही याेजना रद्द करण्याची मागणी करीत युवकांना न्याय मिळवून देण्याचा आग्रही धरला.
आंदोलकांवर गुन्हा दाखल
रायुकांच्या आंदाेलनाची मािहती मिळताच पोलिसांनी धाव घेत आंदाेलकांना तब्यात घेतले. याप्रकरणी खदान पोलस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आंदाेलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या निर्देशानुसार करण्यात आले. आंदाेलनात राकांचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदाेलनात रायुकाँचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, पंकज गावंडे, करण दाेड, जयंत कडू, विशाल गावंडे, पिंटू वानखडे आदी सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.