आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविडविरोधी लस:अकोला जिल्ह्यात 23 टक्के नागरिकांनी अद्यापही घेतला नाही पहिला डोस

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांकडून लसीकरणाकडे पाठ फिरवली जात आहे. अकोला जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीसाठी एकूण लोकसंख्येपैकी पैकी 15 लाख 89 हजार 440 लाभार्थी लसीकरणारासाठी पात्र आहेत. यापैकी 12 लाख 19 हजार 296 लाभार्थ्यांचा पहिला डोस झाला आहे. म्हणजे अद्याप 23.29 टक्के लाभार्थी असे आहेत की ज्यांनी कोविडविरोधी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन

जिल्ह्यात हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर हे दोन गट लसीकरणात आघाडीवर आहेत. या दोन्ही गटांचे अनुक्रमे 91.67 आणि 98.26 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

वयोगट 12 ते 14

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 61 हजार 425 आहे. त्यापैकी 24 हजार 808 म्हणजे 40.39 टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अवघी 8 हजार 160 आहे.

वयोगट 15 ते 17

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 95 हजार 15 आहे. 46 हजारांहून अधिक म्हणजे 49.09 टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस झाला. तर 28.81 टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे.

वयोगट 18 ते 44

लाभार्थ्यांची संख्या ही 8 लाख 81 हजार 800 एवढी आहे. त्यापैकी 73.31 टक्के नागरिकांनी पहिला तर 46.85 टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

वयोगट 45 ते 59

या वयोगटात पहिला डोस घेणारे लाभार्थी हे 82.96 टक्के आहेत. तर 62.84 टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 3 लाख 23 हजार 100 एवढ्या एकूण डोसचे उद्दीष्ट आहे.

वयोगट 60 वर्षावरील

साठ वर्षावरील लाभार्थी नागरिकांची संख्या 2 लाख 28 हजार 100 एवढी असून 90.02 टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस पूर्ण केला आहे. तर 68.83 टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...