आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला जिल्ह्यात खाटांचा तोटा:परिस्थिती गंभीर वाढता संसर्ग आणि गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता खाटांची संख्या अत्यंत तोकडीअकोला

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

जिल्ह्यातील काेराेना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वाेपचार रुग्णालय अािण स्त्री रुग्णालयात ८० खाटांची व्यवस्था करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मनपा, आराेग्य िवभाग, जीएमसी प्रशासन, भाजप अामदारांमध्ये मध्ये चर्चा झाली. सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात काेराेना बाधितांची संख्या वाढतच असून, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला असून, अाॅक्सिजनाचाही तुटवडा निर्माण हाेण्याची शक्यता अाहे. दरम्यान या पृष्ठभूमीवर सोमवारी भाजप लाेकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, आराेग्य व जीएमसीमधील डाॅक्टरांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी िजतेंद्र पापळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजकुमार चव्हाण,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संजय खडसे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ आरती कुलवाल, डॉ कुसुमाग्रज घोरपडे, डॉ सिरसाम, मनापा उपायुक्त आवारे, ४०८ रुग्णवाहिकेचे विभागीय व्यवस्थापकासह, तेजराव थोरात, नगरसेवक गिरीश जाेशी उपस्थित हाेते.

रिक्त खाटांची स्थिती
अकोला जीएमसी ३९
मूर्तिजापूर शासकीय ०५
जिल्हा स्त्री रुग्णालय ३०
खासगी रुग्णालये २१

जिल्ह्यात २३ हॉस्पिटल
जिल्ह्यात सद्यःस्थितीत ०४ शासकीय आणि १९ खासगी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. १९ पैकी १६ रुग्णालयांमध्ये खाटा फुल झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कोरोनामुळे सात रुग्णांचा मृत्यू; ३३८ नवे पॉझिटिव्ह
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा संसर्ग आणि गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या खाटा तोडक्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ४५० खाटांची व्यवस्था आहे. त्यानंतर मूर्तिजापूरच्या शासकीय रुग्णालयात ४०, आरकेटी अकोट येथे ५० व जिल्हा स्त्री रुग्णालयात ५० अशा एकूण ५९० खाटा आहेत. यापैकी ५१५ खाटा भरलेल्या आहेत. तर केवळ ७४ खाटा सध्या शिल्लक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ५०० हून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या ७४ खाटा या अत्यंत कमी असून रुग्णांचा आकडा असाच वाढत गेल्यास परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते.

बुलडाण्यातून रुग्णांचा ओघ वाढताच : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार्या कोरोना बाधित गंभीर रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लगतच्या जिल्ह्यातील आरोग्य सेवा ढासळल्याने दिसते.

भरलेल्या खाटा
अकोला | जिल्ह्यात सोमवारी, १९ एप्रिलला दिवसभरात कोरोनामुळे सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ३३८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. २७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३४२०१ झाली आहे. तर एकूण २८९६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ५६७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेले

सात जण ‘या’ भागातील : काजळेश्वर, ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष, खदान येथील ५८ वर्षीय पुरुष, बोरगाव मंजू येथील ७० वर्षीय पुरुष, महान ता.बार्शीटाकळी येथील २८ वर्षीय महिला, मोठी उमरी येथील ३९ वर्षीय पुरुष, येलवन बोरगाव मंजू येथील ६५ वर्षीय महिला, बोरगाव ता. मूर्तिजापूर येथील ६९ वर्षीय पुरुष

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना भाजपचे नेते.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यावतीने तालुका रुग्णालयात व्हील चेअर व स्ट्रेचर देण्यात आहे. बैठकीत आरोग्य विभागाच्या अडचणी लोकप्रतिनिधींनी समजून घेतल्या. रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा वाढवून देण्याची मागणी भाजपने केली. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी अडचण असल्यास रेल्वे विभागाशी संपर्क साधण्याकरिता ना. धोत्रे यांची मदत घेऊ, असे भाजप नेत्यांनी सांगितले. ना. धाेत्रे यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री पियूष गोयल व ना. नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधता येईल, असेही ते म्हणाले.

‘ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर’ही देऊ
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी वातावरणाच्या हवेतून ऑक्सिजन तयार करून रुग्णांना पुरवण्यासाठी अाॅक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिनची उपलब्ध हाेण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वााही भाजप लाेकप्रतिनिधींनी िदली. याबाबत केंद्रीय मंत्री, व भाजपच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा झाली अाहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने मागणी नाेंदवावी, असेही भाजप लाेकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना सांगितले. मागणी केल्यास लवकरात लवकर मशीनची उपलब्धता करून देऊ अशी ग्वाही ना ना धोत्रे यांनी दिल्याचेही भाजप नेते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...