आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला:आजपासून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी; आदेशाचा भंग केल्यास फौजदारी - जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश​​​​

अकोला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियम पाळण्यासाठी दंड नव्हे; दंडूकेच हवेत काय ? केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांनाच राहणार बाहेर पडण्याची मुभा

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत जमावबंदी-संचारबंदी लागू करण्यात येणार अाहे. हा अादेश शनिवारी २७ मार्चला िजल्हाधिकारी िजतेंद्र पापळकर यांनी जारी केला. संचारबंदीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रासह केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांनाच घराबाहेर पडण्यास मुभा राहणार अाहे. रात्री ९ ते सकाळी ६ या दरम्यान अन्य काेणी अनावश्यक घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कठाेर कारवाई हाेणार अाहे. नियम पाळण्यासाठी अाता दंडात्मक कार्यवाही नव्हे; तर दंडूकेच हवेत काय, असा सवाल अाता यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत अाहे.

जिल्ह्यात िदवसेंिदवस काेराेना िवषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असून, मृतकांचा अाकडाही कमी हाेताना िदसून येत नाही. अनेक जण मात्र िवना मुखपट्टी (मास्क) फिरताना अाणि िफजिकल डिस्टन्सिंगच्या पालनाला हरताळ फासत असल्याचे िदसून येत अाहे. त्यामुळे िजल्हाधिकाऱ्यांनी २८ मार्चपासून पुढील अादेशापर्यंत रात्रीच्या जमावबंदी-संचारबंदीचा अादेश जारी केला.

उल्लंघन केल्यास शिक्षापात्र गुन्हा
िजल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जमावबंदी-संचारबंदीच्या अादेशाचा भंग झाल्यास संबंिधतांवर भादंिवचे कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येणार असून, गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अादेशात नमूद करण्यात अाले अाहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंिधत पाेिलस ठाण्यातील उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नसणाऱ्या अधिकाऱ्यांस प्राधिकृत करण्यात अाले अाहे.

ओळखपत्र बंधनकारक
संचारबंदीच्या काळात बाहेर पडण्याची मुभा असलेल्या घटकांतील व्यक्तिांना त्यांचे अाेळखपत्र व िवषेश कार्यासाठी नेमणुकीचे अादेश, कागदपत्रे साेबत बाळगणे बंधनकारक करण्यात अाले अाहे.

संचारबदी दरम्यान पुढील घटकांना राहणार मुभा
-संचारबंदीमध्ये शासकीय व खासगी रुग्णवाहिका सेवा.
-रात्री सुरु राहणारी अाैषधीची दुकाने.
-अाराेग्य, पाेिलस, अापत्ती व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ति-वाहन. (कर्तव्यावर)
-रुग्ण वाहतूक, रुग्णालयमधील डाॅक्टर, पॅरामेडिकल स्टाफ.
-अत्यावश्यक सेवा-वीज, पाणी, दुरसंचार, अाैषधीची वाहने, अग्निशमन, बंॅक, एटीएममद्ये पैसे भरणारी वाहने व कर्तव्यावर अधिकारी-कर्मचारी.
-जीवनावश्यक वस्तूंची सेवा, वस्तू व मालाची वाहतूक.
-प्रसार माध्यम प्रतिनिधी, वृत्तपत्र छपाई, िवक्रेते.
-रात्रीच्या वेळी सुरु राहणारे पेट्राेल पंप व महामार्गावरील पेट्राेल पंप व ढाबे.
- रेल्वे, एसटी, खासगी बसने उतरणाऱ्या प्रशावांसाठी अॅटाेरिक्षा.
- जिल्हादंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली वाहने, अधिकारी व कर्मचारी.

बातम्या आणखी आहेत...