आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पोलिसांची धडक कारवाई:बनावट देशी दारू कारखाण्यावर पोलिसांची धाड; चार आरोपींना पोलिसांकडून अटक

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बेलुरा खुर्द येथील बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखाण्यावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यात चार आरोपीला अटक करण्यात आली असून, लाखोंचा मुद्देमाल व बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

बेलुरा खुर्द येथे बनावट देशीदारू तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरू होता. या बाबत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारखाण्यावर विशेष पथकाने बेलोरा खुर्द गावात छापा टाकला. तेथे बनावट देशीदारू तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल आढळून आला. त्यात स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट अलकोहोल, फ्लेवर, खाली बाटल्या, झाकने, सीलिंग, लेबलिंग, दोन पॅकिंग मशीन व इतर साहित्याचा समावेश होता. याशिवाय बनावट दारूच्या आठ पेट्याही जप्त करण्यात आल्यात. खाली देशीदारूच्या बाटल्यांसह एकूण एक लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी अमोल दाबेराव, बजरंग किसन दाबेराव, दिनेश देवलाल दाबेराव, राहुल सुभाष बरगे (सर्व रा. बेलोरा खुर्द) या चार आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकातील सदस्यांनी केली.

पोलिसांनी रंगेहात पकडले

आरोपी बनावट साहित्याच्या आधारे देशी दारू बनवत. ही देशी दारू दोन नंबरने गावागावात विकत असत. देशी दारू पोलिसांच्या चोरून विकल्या जाते म्हणून अनेक जण गुपचूप ही दारू विकत घेत असत. देशी दारूसारखा वास येत असल्याने ती देशी दारूच वाटायची. ही जीवावर बेतणारी दारू कधीपासून आरोपी बनवत होते. त्यातून कुणाला काही अपाय झाला का, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...