आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • In Akola, The Administration Hired A DJ At The Covid Care Center; Positive Patients Lose Consciousness And Tremble At The Sound Of 'Zingat'

दिव्य मराठी विशेष:अकोल्यात प्रशासनाने कोविड केअर सेंटरमध्ये लावला डीजे; भान हरपून पॉझिटिव्ह रुग्ण थिरकतात ‘झिंगाट’च्या तालावर

अकोला2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिस्चार्ज मिळाल्यानंतर नृत्य करताना रुग्ण.
  • रुग्णांच्या मनातील निगेटिव्ह विचार डोक्यातून काढण्यासाठी लढवली शक्कल

कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर आपले कसे होईल, आपण सुखरूप घरी परत जाऊ की नाही, हीच धास्ती सतत रुग्णांमध्ये असते. त्याचा परिणाम रुग्णांच्या मानसिकतेवर होतोच. अशा रुग्णांना स्वच्छंदी आणि आनंदी ठेवण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाने नामी शक्कल लढवली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील निसर्गरम्य कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डीजे लावला आहे. या डीजेवर पॉझिटिव्ह आबालवृद्ध रुग्ण रममाण होऊन थिरकतात तेव्हा त्यांच्यात जगण्याची एक नवी उमेद निर्माण होते. सोबतच महसूल प्रशासनातील अधिकारीही त्यांच्यासोबत फिजिकल डिस्टन्स ठेवून थिरकल्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहताना दिसून येतो.

हायरिस्कमधील व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्यासाठी व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी निसर्गरम्य अशा विद्यापीठात रुग्णांची सोय करण्यात आली आहे. येथे दहा दिवस रुग्णांना ठेवण्यात येत आहे. येथील रुग्णांच्या मनोरंजनासाठी आणि तेथील वातावरण आल्हाददायक व्हावे व येथे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह निर्माण व्हावा म्हणून प्रशासनाने हा डीजे लावला आहे. त्यावर देशभक्तिपर गीतांसह इतरही गाण्यावर स्वत: रुग्ण थिरकत आहेत. गुरुवारी ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर काही पॉझिटिव्ह रुग्ण थिरकले. त्यात चिमुकलेही होते. स्वत: निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ‘दिल दिया है जान भी देंगे’ हे गीत गायल्याने येथील रुग्णांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार विजय लोखंडे हे दिवसभर या रुग्णांच्या सान्निध्यात असतात.

रुग्णांच्या मनात सकारात्मक विचार रुजवण्याचा प्रयत्न

येथील रुग्णांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता हे आताच्या घडीला महत्त्वाचे आहे. मनावरचा ताण हलका होऊन वातावरण आल्हाददायक व्हावे हाच हेतू आहे. यातून सकारात्मक विचार रुजवण्याचा हा एक प्रयत्न आहे. - प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

बातम्या आणखी आहेत...