आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल ६ कोटी रुपयांची पाईप लाईन गेल्या काही वर्षांपासून विना वापर पडून आहे. ही पाईप लाईन वापरात आणून अकोलेकरांचे व्यर्थ गेलेले हक्काचे 6 कोटी रुपये कामी आणण्यासाठी व त्यातून नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. 8 ऑगस्टपर्यंत यावर निर्णय झाला नाहीतर 9 ऑगस्टपासून ठिया आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
6 कोटींचा खर्च व्यर्थ ठरला
स्थानिक जठारपेठ परिसरातील गणेश स्विट मार्ट ते प्रसाद कॉलनीपर्यंत व रेल्वे कॉर्टरपर्यंत जवळपास दीड किलोमिटरची पाईप लाईल ही विना वापर पडून आहे. मनपाच्या चुकीच्या नियोजनामुळे या पाईप लाईनसाठीचा तब्बल 6 कोटींचा खर्च व्यर्थ ठरला आहे. ही पाईप लाईन टाकतांनाच संबंधीतांना लक्षात आणून दिली होती पण त्यावेळी संबंधीतांनी दखल घेतली नाही. शेवटी जे व्हायचे ते झाले आणि पाईप लाईन विना वापर पडूण आहे. अजूनही ही पाईप लाईन वापरात आणून झालेला खर्च सार्थकी लावला जावू शकतो.
प्रस्ताव देऊन उपयोग नाही
या पाईप लाईनला रेल्वे कॉर्टरजवळ हॅन्डपंप लावून या पाईप लाईनवर काही ठिकाणी नविन पाईप लाईनची जोडणी करून या विना वापर पडलेल्या पाईप लाईनद्वारे प्रसाद कॉलनी, केला प्लॉट, ज्योती नगर या भागातील नागरिकांना योग्य प्रमाणात व नियमित पाणी पुरवठा केला जावू शकतो. सद्या या भागात योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. या बाबत महापालिका प्रशासनाला निलेश देव यांनी वरील प्रस्ताव सादर केला होता. पण त्या प्रस्तावाचीही दखल घेतली गेली नाही.
9 ऑगस्टपासून आंदोलन
आता विनावापर पडलेल्या तब्बल 6 कोटींच्या पाईप लाईनला वापरात आणून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून याबाबत 8 ऑगस्टपर्यंत निर्णय झाला नाही तर 9 ऑगस्टपासून कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या कक्षात ठिया आंदोलन करण्याचा इशारा निलेश देव यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.