आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • In Akola, Two Quintals Of Beef Were Also Seized After Giving Life To Two Cows; Action Of Special Team Of Police At Two Places, Three Arrested

अकोल्यात दोन गोवंशांना जीवनदान:दोन क्विंटल गोमांसही जप्त; पोलिसांच्या विशेष पथकाची दोन ठिकाणी कारवाई, तिघांना अटक

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गाेवंशांची अवैध वाहतूक थांबण्याचे नाव घेत नसून, पोलिसांच्या विशेष पथकाच्या कार्यवाहीमुळे रविवारी दाेन दाेन गावंशांना जीवनदान मिळाले. तसेच 200 किलाे गाेमांसही जप्त करून तीन आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाेवंशांची निर्दयीतेने वाहतूक सुरू आहे. कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची अनेकदा सुटकाही करण्यात आली. गाेवंशांना वाचवण्यासाठी वििवध यंत्रण व स्वयंसेवी संघटनांकडून प्रयत्न करण्यात येतात.

मात्र तरीही गाेवंशाची अवैध वाहतूक थांबत नसल्याचे 11 सप्टेंबर राेजी दिसून आले. एका चार चाकी वाहनातून अवैध कत्तलीसाठी गाेवंशांची वाहतूक करण्यात येत असल्याची मािहती पाेलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळाली. पथकाने जनता भाजी बाजारनजीक नाकाबनदी केली. याठिकाणी एमएच-20-एलएल-5016 हे वाहन पथकातील पोलिसांनी थांबवले. यात दाेन गाेवंश दिसून आले.

विनापरवाना वाहतूक हाेत असल्याचेही समाेर आले. दाेन गाेऱ्यांच्या अंगावर जखमाही हाेत्या. हा मुद्देमाल विकास लक्षमण लवारे (वय 30, रा शिवनी) याच्याकडूज जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ५ लाख रुपये किंमतीचे वाहन,90 हजाराचे दाेन गाेऱ्हे अशा 5 लाख 90 हजाराच्या ऐवजाचा समावेश आहे. याप्रकरणी सिटी काेतवाली पोलिस ठाण्यात आराेपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

येथे केली दुसरी कार्यवाही

बार्शीटाकळी येथून अवैधरित्या कत्तल करून गोमांस खदान परिसरात विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची मािहती पोलिसांच्य विशेष पथकाला मिळाली हाेती. पथकाने खदान नाक्याच्या परिसरता नाका बंदी केली. पथकाने एमएच-30-पी-7541 या क्रमांकाचे वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 200 किलाे गाेमांश आढळून आले. कत्तल केल्यानंतर हे मांस जमा करण्यात आले हाेते. पाेिलसांनी 40 हजार रुपये किंमतीचे गाेमांस व 2 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मुद्देमाल जमशेद खान जफरखान (वय 50) व शेख रहमान शेख अजीज (वय वर्षे 45 , दाेघेही रा. बार्शीटाकाळी) यांच्याकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरेपींविरूद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...