आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खतांची गरज असूनही तुटवडा:पुरवठा न झाल्यास आंदोलन ; शिवसेनेचा इशारा, नंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाला असून, पुरवठा न झाल्यास अांदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना साेमवारी सादर केलेल्या निवेदनात दिला.

जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्यात तीन वेळा प्रचंड अतिवृष्टी झाली. परिणामी शेतात पाणी साचले. शेतकऱ्यांना शेतात जाणेही शक्य नव्हते. मात्र तीन-चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून शेतीची कामे उरकून खतही देता येते. पिकांना खताची गरजही आहे मात्र, खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे तातडीने खत उपलब्ध देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे िजल्हाप्रमुख तथा जि. प. गट नेते गाेपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांना सादर केलेल्या निवेदनात केली.

निवेदन देताना युवा नेते राहुल कराळे, अकाेले पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, सुरेन्द्र विसपुते, जि.प.सदस्य संजय अढाऊ, साेनू भरकर, अनील पाटील निकामे, महादेव भिसे, अभय खुमकर, सौरभ घोलपकार, अनिल मोहोकार आदी उपस्थित हाेते.

असे आहे पुरवठ्याचे चित्र

जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 साठी खताचे आवंटन 83 हजार 310 मेट्रीक टन मंजूर होते. प्रत्यक्षात आतापर्यंत 23 हजार 451 मेट्रीन व मागील वर्षीचे शिल्लक 21 हजार 734 मे. टन असे एकूण 41 हजार टन खत अद्याप प्राप्त झालेले नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

25 जूननंतर खत उपलब्धच नाही

खरीप हंगामात आताच खताची अत्यंत आवश्यकता असून, खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 25 जूननंतर जिल्ह्यात खताच्या बॅगच उपलब्ध झाल्या नाहीत. मात्र खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रासायनिक खताची दोन दिवसात तत्काळ उपलब्धता करण्यात यावी; अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेने दिला. कृषी विभाग झाेपेचे साेंग घेत असून, काेणत्याच प्रकाराची उपाय याेजना करण्याच्या मानसिकेत नाही, असा आराेपही शिवसेनेने केला.

बातम्या आणखी आहेत...