आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेळा साेहळा:खंडेलवाल विद्यालयामध्ये रंगला तान्हा पाेळा साेहळा

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी बांधवांचा सक्षम साथीदार असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा उत्साहात साजरा झाल्यानंतर तान्हा पाेळाही पार पडत आहे. भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात तान्हा पाेळ्याचा साेहळा अायाेजित करण्यात आला हाेता.

भिकमचंद खंडेलवाल विद्यालयातील इयत्ता ५ ते ७मधील विद्यार्थ्यांनी साेहळा आयोजित केला होता. विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली. पोळ्या निमित्त सामूहिक गीत व एक नृत्यही विद्यार्थ्यांनी सादर केले. बैल सजावट स्पर्धा, मातीचे बैल तयार करणे अशा स्पर्धाही आयाेजित करण्यात अाल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक नरेंद्र मायी यांनी केले. दोन्ही गटातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गैरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र राठोड हाेते. प्रमुख मार्गदर्शन अनंता साकरकार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मंगला भोपळे यांनी केले. साेहळ्यात शिक्षक प्रशांत उंबरकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...