आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत निरोप:मूर्तिजापुरात भक्तांनी दिला गणरायांना भावपूर्ण निरोप

मूर्तिजापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणात उल्हास आणि चैतन्य निर्माण करणारे गणरायाचे आगमन विविध भावपूर्ण संदर्भासह जीवन जगण्यासाठी शिकवण देणारे असते. अहंकारातून मुक्ती आणि जीवन जगताना येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत भक्ती, शक्ती आणि युक्तीच्या त्रिवेणी माध्यमातून जगत कल्याणाची अनुभूती देणारी गणरायांची स्थापना गेल्या दहा दिवसापासून शहरांमध्ये विविध सार्वजनिक मंडळ तसेच घरोघरी करण्यात आली होती. आज गणरायांना दहा दिवसांच्या आराधनेनंतर जल्लोषासह उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत निरोप देण्यात आला आणि पुढच्या वर्षी लवकर या, असा आर्जव भक्तांनी केला.

मूर्तिजापूर शहरासह गावखेड्यातील गणरायांचे विसर्जन ९ आणि १० सप्टेंबर अशा दोन दिवसात करण्यात आले. तालुक्यातील एकूण तीन पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण २१९ सार्वजनिक गणेश मंडळाच्या द्वारा बाप्पांची स्थापना केली होती. यामध्ये मूर्तिजापूर शहरात ८६, तर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात ५ ठिकाणी मिळून एकूण ९१ सार्वजनिक मंडळांद्वारा गणरायांची स्थापना करण्यात आली होती. तसेच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ७६ गावांमध्ये गणपतीची सार्वजनिक ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. तर माना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांपैकी एकूण ५२ सार्वजनिक गणेश मंडळांद्वारा गणपतीची स्थापना करण्यात आली होती.

भक्तिभावाने दहा दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर शुक्रवारी माना पोलिस स्टेशन अंतर्गत ५२ पैकी २८ तर उर्वरित २४ गणरायांचे १० सप्टेंबरला विसर्जन झाले. तसेच मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ९१ सार्वजनिक गणपतींपैकी ५८ गणपतींचे ९ सप्टेंबरला तर ३१ गणपतीची १० सप्टेंबरला विसर्जन झाले. उर्वरित दोन मंडळाचे विसर्जन ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत ७६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एकूण ४८ सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन शुक्रवारी पार पडले. तर उर्वरित २८ गणरायांचे विसर्जन शनिवारी रोजी करण्यात आले. सर्वत्र पोलिस बंदोबस्त स्वच्छ ठेवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...