आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेने एक मे पासून वविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आहे राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींमधील मागण्यांबाबत संघटनेन पाठपुरावा करूनही शासनामार्फत मागण्या मंजूर होत नसल्याने संघटनेच्या राज्य कार्यकारणीकडून राज्य सरकारला नविेदन दिले. नगर विकास विभाग, नगर परिषद संचालनालय यांना नविेदन देऊनही ठोस निर्णय झाला नाही. नविेदननुसार ५ एप्रिल २०२२ राज्यातील कर्मचारी यांनी काळी फिती लावून काम केले. २० एप्रिल रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढला होता.
परंतु ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला. प्रलंबित मागण्यांबाबत नगर परिषद येथील पाणीपुरवठा, आरोग्य विभागाचे कर्मचारी संपावर गेले. महाराष्ट्र दनिाचे ध्वजवंदनानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिरीष गांधी यांनी सांगितले. या संपात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे कर्मचारी सहभागी आहेत. याचे नविेदन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक यांना पाठवले. संपात रवी सारवान, शालिग्राम यादव, वनिोद तेलगोटे, चेतन मिलांदे, महिंद्र खांडेकर, प्रवीण शर्मा, विजय लकडे, रवींद्र गुल्हाने, नरसिंग चावरे, संजय गायकवाड, विजय कोरडे, विशाल गंजाळे, सुभाष अवलवार, संतोष पिंपळे, नरेंद्र फुरसुले, शशिकांत परळीकर, वसंत गायकवाड, मशरुल खान, सुभाष बावणे उपस्थित होती. समस्यांकडे लक्ष नाही ः सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष नाही. त्यामुळे राज्य पातळीवर संप पुकारलेला आहे. या संपात मूर्तिजापूर येथील सर्व सफाई कर्मचारी सहभागी झाले आहे, अशी माहिती अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष रवी सारवान यांनी दिली.
निवेदन देवूनही कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही
न.प,तील अत्यावश्यक सेवेसह १९४ कर्मचारी संपात सहभागी झाले. शासनाने न. प. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे. न.प. कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असून आंदोलने, नविेदने देऊन न्याय मिळाला नाही. त्यामुळे संपात सहभागी व्हावे लागले.
शिरीष गांधी, अध्यक्ष, नगरपरिषद कर्मचारी संघटना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.