आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला निवेदन:‘सर्वाेपचार’मध्ये काेराेना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांना हटवले

अकाेला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वाेपचार रुग्णालयात कोरोनाच्या संकटकाळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांचे काम बंद करण्यात आले असून, ६ ते ७ महनि्यांचे वेतन थकल्याने त्यांनी साेमवारी उपाेषण केले. याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे जीएमसी व जिल्हा प्रशसानाला निवेदन देण्यात आले. हे उपाेषण जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात एका कंपनीने सन २०१७ पासून कंत्राटी पद्धतीने काही कामगारांची नियुक्ती केली. त्यानंतर गत जवळपास दाेन वर्षे कोविडच्या काळात जीवाची बाजी लावून कामगारांनी सेवा केली. मात्र १ जुलै २०२२ राेजी पासून सेवा ज्येष्ठता डावलून नवीन १० कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आराेप अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर काँग्रेसने निवेदनात केला आहे. उपराेक्त प्रकरणी आॅगस्ट महनि्यातही कामगारांनी आंदाेलन केले हाेते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर १४ ऑगस्टपासून आंदाेलन स्थगित करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही बाब कंपनीशी संबंधित असल्याने चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितल हाेते. मात्र अद्यापही याप्रकरणी ताेढाचा ताेडगा निघाला नाही. त्यामुळे साेमवारी आकाश जाधव, नीतेश वानखडे यांनी उपाेषण सुरू केले. कंपनीच्या प्रमुखांना सूचना देऊन मुदतीच्या आत सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र कामगारांना कामावर रजू करून घेण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...