आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎ समारंभ उत्साह:श्रीमती लरातो वाणिज्य महाविद्यालयामध्ये‎ प्रा. डॉ. जयंत काळेंना निवृत्ती निमित्त निरोप‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती लरातो वाणिज्य‎ महाविद्यालयात वाणिज्य विभाग‎ प्रमुख प्रा. डॉ. जयंत काळे यांचा‎ निवृत्ती निमित्त निरोप व सत्कार‎ समारंभ उत्साहात झाला.‎ समारंभाच्या अध्यक्षस्थानी‎ प्राचार्य डॉ. एस. जी. चापके होते.‎ कार्यक्रमाची प्रास्ताविक कॉलेज‎ कौन्सिलच्या सचिव प्रा. डॉ. वंदना‎ मिश्रा मांडली. जयंत काळे यांचा‎ निवृत्तीबद्दल आणि त्यांनी प्रदान‎ केलेल्या सेवांबद्दल शाल-श्रीफळ‎ देऊन त्यांचा सत्कार करण्यात‎ आला. डॉ. काळे यांनी सत्काराला‎ उत्तर देताना, महाविद्यालयातील‎ कार्यकाळादरम्यान आलेल्या अनेक‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अनुभवांना आणि आठवणींना‎ उजाळा दिला.

प्राचार्य चापके यांनी‎ देखील डॉ. काळे सरांबरोबर‎ महाविद्यालय आणि विद्यापीठ‎ स्तरावर काम करताना आलेल्या‎ अनुभवांच्या आठवणींवर प्रकाश‎ टाकला. डॉ. काळे यांच्या‎ निवृत्तीनंतरच्या सुखीसमाधानी व‎ समृद्धआयुष्यासाठी अनेकांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रा.डॉ.‎ मोनिका तापडिया यांनी आभार‎ मानले. कार्यक्रमाला‎ महाविद्यालयाचा आय क्यू ए सी‎ समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल,सर्व‎ विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक‎ वर्ग व प्रशासकीय वर्ग बहुसंख्येने‎ उपस्थित होते, अशी माहिती‎ कळवण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...