आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप‎:सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्ह्यातील‎ ; तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्र वाटप‎

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्ह्यातील‎ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्रांचे‎ वाटप जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते‎ करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे‎ संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम‎ राबविण्यात आला.‎

लोकशाही सभागृहात आयोजीत या‎ कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा‎ यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु.‎ काळे,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ.‎ अनिता राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी‎ डॉ. धनंजय चिमणकर, स्वयंरोजगार‎ अधिकारी निशिकांत पोफळी तसेच अन्य‎ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक‎ आयुक्त डॉ. राठोड यांनी सामाजिक न्याय‎ विभागातर्फे तृतीयपंथीय व्यक्तिंच्या हक्कांचे‎ संरक्षण व त्यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या‎ विविध योजनांबाबत माहिती सांगितली.‎ तसेच यामागील शासनाची भुमिका विषद‎ केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा व‎ उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते तृतीयपंथी‎ व्यक्तिंना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित‎ करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरीत‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...