आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात; आकाशाकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे‎

आकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर बाजार‎ लांबलेल्या मान्सूनमुळे पावसानेही ‎तालुक्यांकडे पाठ फिरवली आहे.‎ मृगाच्या पावसाकडे डोळे लावून‎ बसलेल्या बळीराजाच्या पदरी‎ निराशाच आली आहे. पेरणीयोग्य‎ पावसाने अद्यापही तालुक्यात हजेरी न लावल्याने पेरणी खोळंबली असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे‎ वळत असल्याचे चित्र तालुक्यात‎ पहायला मिळत आहे.‎ कोरोनाच्या काळात व त्यानंतरही‎ मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी पेरणी‎ करीत उत्पादन घेतले, परंतु‎ शेतमालाला योग्य भाव नसल्याने‎ शेतकऱ्यांनी येईल त्या भावात,‎शेतामालाची विक्री केली. रब्बी‎ हंगामात कोसळलेल्या अवकाळी‎ पावसाने कांदा, गहू, हरभऱ्यासह‎ भाजीपाला पिकांना दगा दिला.

त्यामुळे‎ चांगल्या अपेक्षेत असलेल्या‎ ‎शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.‎ अशाही परिस्थितीत या वर्षी खरीप‎ हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर‎ कसली, परंतु जून महिन्याचा मध्यान्ह‎ उलटायला आला, तरी पावसाने हजेरी‎ नाही. परिणामी दमदार‎ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या‎ शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या‎ आहेत. शेतीच्या मशागतीची कामेही‎ अंतिम टप्प्यात आली आहेत. डिझेल‎ दरवाढीचा फटकाही शेतकऱ्यांना सहन‎ करावा लागला. मागील काही‎ दिवसांपासून तालुक्यात पावसाचे‎ वातावरण तयार होऊ लागले आहे,‎ परंतु आज पाऊस येईल, उद्या पाऊस‎ येईल या प्रतीक्षेत असलेल्या‎ बळीराजाच्या पदरी निराशाच पडली .‎

बेमोसमी पावसाचा फटका :‎ दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी‎ पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती पिके न‎ आल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण‎ झाली आहे. शेतीमाल भाव नाही.‎ शेतमाल विकून आलेल्या अल्पशा‎ पैशातून बी-बियाणे, खते मजुरी‎ आदीचे नियोजन होणार नाही म्हणून‎ शेतकरी उसनवारी करताहेत. तर‎ बेमोसमी चा फटका बसू नये, अशी‎ प्रार्थना शेतकरी करताहेत.‎ खरीप हंगामासाठी मशागतीच्या कामात व्यस्त असलेले शेतकरी

बातम्या आणखी आहेत...