आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन मार्गाच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या:गणेश मंडळच्या बैठकीत पदाधिकारी, नागरिकांचा सूर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरातील गणेश मंडळाचे सुयोग्य संचालन व व्यवस्थापन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व प्रशासनाची बैठक निमवाडी परिसरातील पत्रकार भवनात पार पडली. महानगरातील गणेश विसर्जन मार्गातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी बैठकीत झाली.

बैठकीत घेतला निर्णय

गत दोन वर्षे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्सवांवर मर्यादा होत्या. दोन वर्षे जाहीर कार्यक्रमांच्या संख्यांवर मर्यादित होती. मात्र यंदा निर्बंध हटवण्यात आले असून, गणेशोत्सवाला धुमधडाक्यात प्रारंभ झाला. गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ व विविध शासकीय यंत्रणाही सज्ज आहेत.

दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जिल्हा प्रशासानाची बैठक आयोजीत करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता यांच्या अध्यक्षतेत आयोजित या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे,मंडळाचे कार्याध्यक्ष हरीश आलीमचंदानी, महासचिव तथा वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, विजय तिवारी, दिलीप खत्री, संतोष पांडे, मनोज साहू,जयंत सर देशपांडे, संतोष अग्रवाल, मनीष हिवराळे, माजी नगरसेवक मंगेश काळे, मनोहर पंजवाणी, नीरज शाह आदी उपस्थित होते.

प्रास्तविक मंडळाचे महासचिव सिध्दार्थ शर्मा यांनी अध्यक्षीय मनोगत अ‍ॅड. मोहता यांनी केले. यावेळी हरीश अलिमचंदानी यांनी आपले मनोगत व्यक केले. संचालन सरदेशपांडे यांनी आभार विठ्ठल गाढे यांनी केले. बैठकीला गोपाल नागापुरे, अक्षय नागापुरे, अ‍ॅड.सौरभ शर्मा, अ‍ॅड. राघव शर्मा, रामदास सरोदे,रमेश अलकरी, पंकज जायले आदी उपस्थित होते.

हा झाला निर्णय

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकित यंदाच्या गणेशोत्सव तथा श्री विसर्जन मिरणुकीवर चर्चा करण्यात आली. यंदाही प्रथम मानाचे चार गणपती नंतर प्रथम या प्रथम नंबर घ्या या पद्धतीनुसार गणेश मंडळांना मिरवणुकीतील नंबर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानाच्या चारमध्ये अनुक्रमे प्रथम श्री बाराभाई गणनती, श्री राजेश्वर गणेशोत्सव मंडळ, श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ व श्री खोलेश्वर गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे.

अशा राहणार तयारी

बैठकीत प्रा. खडसे यांनी विसर्जन संदर्भातील अनेक मुद्यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. विसर्जन स्थळी क्रेन व नैसर्गिक आपत्ती बचाव पथक व पोलिस पथक कार्यरत राहणार आहेत. कुत्रीम विसर्जन स्पॉटही कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...