आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील २३ प्राथमिक आराेग्य केंद्रांची (पीएचसी) जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पथकांनी अचानकपणे पाहणी केली. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात तीन पीएचसींना कुलूप हाेते; तर अन्य काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी गैरहजर हाेते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या त्रृटी आढळल्या. याचा अहवाल सर्व पथकांकडून मंगळवारी संकलित करण्याचे काम सुरू हाेते. दाेन ते तीन दिवसांत अहवाल तयार झाल्यानंतर कारवाईची दिशा निश्चित हाेणार आहे, असे जि.प. आराेग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यानिमित्ताने ग्रामीण भागातील आराेग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून आले. जि. प.च्या अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे अनेकदा समाेर आले आहे. अनेक प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रात डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी वेळेवर येत नाहीत. काही जण तर मुख्यालयी थांबतही नाहीत. याचा परिणाम आराेग्य सेवेवर हाेत असून, दुर्गम भागातून उपचारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांचे हाल हाेतात. दरम्यान साेमवारी रात्री जि.प. व पंचायत समितीच्या पथकांनी अचानकपणे पीएचीसींच्या केलेल्या पाहणीत बेताल कारभार चव्हाट्यावर आला.
अशी केली पाहणी
पथकाने आराेग्य केंद्रात हजेरी पुस्तिकेसह काही नाेंद वह्यांची तपासणी केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत त्यांना काही प्रश्नहीविचारले. बंद आराेग्य केंद्राबाहेर ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांना आराेग्य सुविधांबाबतविचारणा केली. पीएचसी बंद असल्याने तेथून जात असलेल्या एका महिलेशीही पथकाडून संवाद साधण्यात आला.
स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारीवदि्या पवार, आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसाेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूरज गाेहाड, गटविकास अधिकाऱ्यांसह अन्यविभाग प्रमुखही पथकात सहभागी हाेते. त्यामुळे ही अकस्मात पाहणीची माेहीम प्रशासनाने गांभीर्याने राबवल्याचे दिसून येते.
अशीही गाेपनीयता
प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या आकस्मात पाहणीसाठी वरिष्ठ स्तरावरूनच गाेपनीय पद्धतीने नियाेजन करण्यात आले हाेते. काेणत्या पथकाला कुठे जाऊन पाहणी करायची, याचे प्रत्येकाचे स्वतंत्र आदेश बंद लिफाफ्यात दिले हाेते. मार्गस्थ हाेईपर्यंत पथक प्रमुखाशिवाय अन्य काेणालाच स्थळाची व माेहीमेची माहिती नव्हती. जिल्ह्यातील २३ प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या पाहणीसाठी जिल्हास्तरावर १४ पथके आणि पंचायत समितीस्तरावर ९ पथकांचे गठण केले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.