आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिकलसेल दिन:अकोल्यात गेल्या 11 वर्षांमध्ये आढळले सिकलसेलचे 225 रुग्ण; आजार रोखण्यासाठी जागरूक राहा

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात २०११ पासून सिकलसेल आजार नियत्रंण कार्यक्रम राबवण्यात येत असून, आतापर्यंत अकरा वर्षात ८ लाख ३ हजार १४७ सोल्युबिलीटी चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये १० हजार ८२१ पॉझिटिव्ह अहवाल आढळले. यात ४ हजार ६९३ वाहक तर २२५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान सिकलसेलच्या मुक्तीसाठी नागरिकांनी जागृत राहून या आजाराचा प्रसार टाळण्यासाठी सिकलसेल ग्रस्त व्यक्तीने दुसऱ्या सिकलसेल ग्रस्त व्यक्तीशी विवाह टाळावा,’ असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने आजच्या जागतिक सिकलसेल दिनानिमित्त करण्यात येत आहे.सिकलसेलबाबत माहिती देताना तज्ज्ञ सांगतात की, सिकलसेल हा हिमोग्लोबिनचा आजार आहे. जनुकीय दोषांमुळे रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होतो. यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या होतात. रक्त तपासणीच्या माध्यमातून या आजाराचे ही आहेत लक्षणे रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होणे रुग्णाचे हातपाय खूप दुखणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे दम लागणे, कावीळ होणे ऑक्सिजनच्या अभावाने तीव्र वेदना होणे वर्ष चाचण्या पॉझिटिव्ह वाहक रुग्ण २०१९-२० ४०९५८ ९९२ ५१२ १४ २०२०-२१ ५५३०९ ६५७ ३७८ ११ २०२१-२२ ३३८३३ ७०६ ४६१ १८ निदान करता येते. रक्ताच्या प्राथमिक तपासणीला सोल्युबिलीटी तपासणी म्हणतात. यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची हिमोग्लोबीन इलेक्ट्रोफोरसिस ही विशिष्ट चाचणी करून निदान करण्यात येते. सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून, काही विशिष्ट घटकांमध्ये हा रोग अधिक प्रमाणात आढळतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्णांचे आहेत दोन प्रकार :सिकलसेल या आजारात दोन प्रकारचे रुग्ण आढळतात. एक प्रकार म्हणजे सिकलसेल वाहक आणि दुसरा सिकलसेल पीडित असतो. वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या अपत्यातही सिकलसेल गुणधर्म आढळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...